मुक्तपीठ टीम
१ सप्टेंबर २०२१ पूर्वी कर्मचारी भविष्य निधी संघटनेला (EPFO) यूएएन क्रमांकाशी आधार जोडणे आवश्यक आहे. सामाजिक सुरक्षा संहितेच्या कलम १४२ अंतर्गत पीएफ खात्याला आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे. जर तुमचा आधार तुमच्या UAN शी जोडलेला नसेल तर तुमचा नियोक्ता (काम करत असलेली कंपनी) तुमच्या EPF खात्यात मासिक PF योगदान जमा करू शकणार नाही.
कसं होईल नुकसान?
- जोपर्यंत लिंकिंग पूर्ण होत नाही, तोपर्यंत तुम्ही कर्ज घेऊ शकणार नाही
- तुमच्या EPFमधून पैसे काढू शकणार नाही.
- तुम्हाला ईपीएफओ सेवांचे लाभ मिळणार नाहीत.
- जर या नियमाचे पालन केलं नाही तर, नियोक्त्याकडून मासिक ईपीएफ योगदान न मिळाल्यामुळे ईपीएफओच्या इतर काही सेवा देखील मिळू शकणार नाहीत.
- पेन्शन फंडातील तुमच्या योगदानावरही परिणाम होईल.
- सेवानिवृत्ती निधीचा लाभ घेण्यासाठी तुमचं आधार कार्ड भविष्य निर्वाह निधी खात्याशी जोडणे अनिवार्य आहे.
- ईपीएफओने जूनमध्ये इलेक्ट्रॉनिक चलान आणि रिटर्न (ईसीआर) दाखल करण्याच्या नियमांमध्ये बदल केला आहे.
- ज्या कर्मचाऱ्यांचे आधार यूएएनशी जोडलेले आहे, त्यांनी फक्त त्या कर्मचाऱ्यांनाच ईसीआर भरण्याची परवानगी दिलीय.
ईपीएफओने दिलेली माहिती खालीलप्रमाणे: - ईपीएफओने नियोक्त्यांना सेवांच्या अखंड प्रवेशासाठी आधार यूएएनशी जोडलेले असल्याची खात्री करण्यास सांगितले आहे.
- जर यूएएनशी आधार लिंक न केल्यास कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात रक्कम जमा झाली नाही तर ते त्या रकमेवरील व्याजही गमवावं लागू शकतं.
कसं कराल यूएएन आधारशी लिंक?
- सुरुवातीला EPFO च्या अधिकृत वेबसाईटवर जा.
- https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या लिंकवर क्लिक करा.
- तुमचा यूएएन आणि पासवर्ड टाकून लॉग-इन करा.
- मॅनेज विभागात केवायसी पर्यायावर क्लिक करा.
- आता तुम्हाला ईपीएफ खात्याशी आधार लिंक करण्यासाठी अनेक कागदपत्रे दिसतील.
- तुम्ही आधार पर्याय निवडा आणि आधार कार्डवर तुमचा असलेला आधार क्रमांक आणि तुमचं नाव टाईप केल्यानंतर सेवांवर क्लिक करा.
- यानंतर तुम्ही दिलेली माहिती सुरक्षित असेल आणि तुमचे आधार UIDAI च्या डेटासह पडताळणी केली जाईल.
- तुमचे KYC दस्तऐवजबरोबर असल्यास तुमचे आधार तुमच्या EPF खात्याशी जोडले जाईल आणि तुम्हाला तुमच्या आधार माहितीसमोर “Verify” लिहिलेले मिळेल.