मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र, बंगालमध्ये गाजणारा राज्यपाल विरुद्ध सरकार म्हणजे लोकप्रतिनिधी वाद आता चंदिगडमध्येही पोहचला आहे. पंजाबचे राज्यपाल आणि चंदिगडचे प्रशासक बनवारीलाल पुरोहित यांचे सल्लागार आणि प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधींना महत्वच देत नाहीत, अशी तक्रार आहे. भाजपाच्या स्थानिक खासदार किरण खेर यांना एका महत्वाच्या कार्यक्रमाचं निमंत्रणच नव्हतं. त्या तिथं गेल्या आणि त्यांनी सर्वांनाच प्रोटोकॉलपासून सर्वच मुद्द्यांवर सुनावलं!
खासदारांनाच विसरले प्रशासन…
- सोमवारी चंदीगड प्रशासनाने शहरातील सेक्टर-१० येथील विविध विभागांच्या ८६ सेवा ऑनलाइन करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता.
- या कार्यक्रमाला खासदार किरण खेर यांना निमंत्रित न केल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.
- कार्यक्रमाला पोहोचलेल्या खासदार किरण खेर यांनी संताप व्यक्त करत म्हणाल्या की, मी चंदीगडहून उपचारासाठी गेले तर अधिकारी मला विसरले.
- असे करू नका, दु:ख होते. आता मी परत आले आहे, मी आता तुम्हाला भेटत राहीन जेणेकरून तुम्ही मला विसरणार.
नगरसेवकांनी केली प्रशासनाची तक्रार
- खासदार किरण खेर जेव्हा चंदीगडला पोहोचल्या तेव्हा सेक्टर-३३ कार्यालयातील भाजपा नगरसेवकांनी त्यांना सांगितले की अधिकारी त्यांचे ऐकत नाहीत.
- महापालिकेत एकदा चर्चा झाली तरी प्रशासनाकडून त्यांच्या प्रश्नांची उत्तरेही मिळत नाहीत.
- आता सोमवारी प्रशासकीय कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी खासदारांना निमंत्रण पत्र पाठवले नाही.
- खासदाराच्या नाराजीनंतर अधिकार्यांनी त्यांना कार्यक्रमाला बोलावले पण त्या पोहोचल्यावर कोणीही त्यांना घ्यायला गेले नाही.
- खासदार आतमध्ये पोहोचताच त्यांनी प्रशासकाचे सल्लागार आणि डीसी यांच्यासमोर आपली नाराजी व्यक्त केली.
नाराजीनंतरही प्रोटोकॉलचा भंग!
कार्यक्रमानंतर सर्वजण निघू लागताच चंदिगडचे प्रशासक बनवारीलाल पुरोहितांच्या पाठोपाठ सल्लागारांची गाडी लावण्यात आली.
प्रोटोकॉलनुसार खासदारांची गाडी तिथे लावायला हवी होती, असे सांगत किरण खेर यांनी सल्लागाराला गंमतीने सांगितले की, आता व्यवस्था बदललेली दिसते.