मुक्तपीठ टीम
गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनचा अमूल हा ब्रँड कोणत्याही मोठ्या एफएमसीजी कंपन्यांना लाजवणाऱ्या वेगानं मोठा होत आहे. आतापर्यंत अमूल दूध आणि इतर डेअरी उत्पादन मिळत असत. आता मात्र अमुलने सेंद्रिय गव्हाचे पीठ लाँच केले आहे. हे पीठ साधेसुधे नाही तर ‘अमूल ऑरगॅनिक होल व्हीट आटा’ आहे. अमुल भविष्यात मूग डाळ, तूर डाळ, चना डाळ आणि बासमती तांदूळ यांसारखी उत्पादनेही बाजारात आणणार आहे.
सेंद्रिय तपासणी केली जाणार!
- शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीशी आणि बाजारपेठेशी जोडण्यासोबतच अमूल देशभरात पाच ठिकाणी सेंद्रिय चाचणी प्रयोगशाळा उभारणार आहे.
- अहमदाबाद येथील अमूल फेड डेअरीमध्ये अशा प्रकारची पहिली प्रयोगशाळा उभारली जात आहे.
जूनपासून सेंद्रिय पीठ मिळणार!
- जूनच्या पहिल्या आठवड्यापासून गुजरातमधील सर्व अमूल पार्लर आणि रिटेल आउटलेटवर सेंद्रिय पीठ उपलब्ध होईल.
- जूनपासून गुजरात, दिल्ली-एनसीआर, मुंबई आणि पुणे येथेही ऑनलाइन ऑर्डर करता येणार आहे.
- एक किलो पिठाची किंमत ६० रुपये आणि पाच किलो पिठाची किंमत २९० रुपये आहे.
- सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना एकत्र आणले जाईल आणि दूध संकलनाचे तेच मॉडेल या व्यवसायातही स्वीकारले जाईल.
कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आर.एस.सोढी यांना स्पष्ट केले की, सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना एकत्र आणले जाईल आणि दूध संकलनाचे हेच मॉडेल या व्यवसायातही स्वीकारले जाईल. यामुळे सेंद्रिय शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि सेंद्रिय अन्न उद्योग अधिक लोकशाही होईल.