Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

डिसेंबरपर्यंत धावणार हायस्पीड मालगाडी, १६ मालडब्यांसह १६० किमीचा वेग!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Gati Shakti Train

मुक्तपीठ टीम

सध्या भारतीय रेल्वे आपल्या सेवेत आणि प्रवासात उत्तम बदल घडवत आहे. भारतातील पहिली सेमी-हाय स्पीड मालगाडी डिसेंबरपर्यंत रुळावर धावण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. सोळा मालडब्यांच्या गती शक्ती रेल्वेचा वेग १६० किमी प्रतितास असेल. चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये ते तयार करण्यात येत आहे. या गाड्यांसाठी डिझाइनिंगचे काम सुरू झाले आहे. रेल्वेने साहित्याची ऑर्डरही दिली आहे. या वर्षी डिसेंबरपर्यंत यापैकी दोन गाड्या तयार होतील. अशा २५ गाड्या तयार करण्याचे रेल्वेचं लक्ष्य आहे.

या गाड्यांद्वारे ई-कॉमर्स आणि कुरिअर पार्सल सेगमेंटला लक्ष्य करण्याचा रेल्वेचा विचार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रत्येक रेल्वेमध्ये दुग्धजन्य पदार्थ, मासे, फळे आणि भाजीपाला यांसारख्या नाशवंत वस्तू वाहून नेण्यासाठी रेफ्रिजरेटेड जेटेड वॅगन्स देखील असतील. या वॅगनसाठी डब्यातून वीज जोडणी दिली जाणार आहे. कंटेनर लोडिंग आणि अनलोड करण्यासाठी प्रत्येक डब्याला दोन रुंद दरवाजे असतील. भारतीय रेल्वेने देशभरात ७४ नवीन गति-शक्ती मल्टी-मॉडल कार्गो टर्मिनल्स ओळखले आहेत. त्यापैकी २० दक्षिण भारतीय राज्यांमध्ये आहेत.

नवीन वंदे भारत रेल्वेची लवकरच होणार चाचणी

  • नवीन सेमी-हाय स्पीड वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांची चाचणी ऑगस्टमध्ये अपेक्षित आहे.
  • १६ डब्यांच्या सेमी-हाय स्पीड वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचा नवीन संच अंदाजे ११५ कोटी रुपये खर्चून बांधला जाईल. अधिकाऱ्यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.
  • रेल्वेने ऑगस्ट २०२३ पर्यंत अशा ७५ गाड्यांचे उत्पादन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले, की अशा दोन रेल्वे आधीच दिल्ली -कटरा आणि दिल्ली-वाराणसी दरम्यान धावत आहेत. या नव्या रेल्वेसमध्ये सुरक्षेसोबतच अनेक अतिरिक्त वैशिष्ट्ये असतील. वंदे भारत रेल्वेच्या नवीन सेटचे सर्वात मोठे सुरक्षा वैशिष्ट्य म्हणजे टक्कर टाळण्याची यंत्रणा. ही रेल्वे ९९ टक्के स्वदेशी असेल. फक्त काही किरकोळ घटक आयात केले जातील. इंटिग्रल कोच फॅक्टरी दरमहा सुमारे १० गाड्या तयार करण्याची योजना आखत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्ट २०२३ पर्यंत अशा ७५ रेल्वे बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

पाहा व्हिडीओ:


Tags: good newsHigh speed freight trainindian railwaysmuktpeethSemi-High Speed Freightचांगली बातमीभारतीय रेल्वेमुक्तपीठसेमी-हाय स्पीड मालगाडीहायस्पीड मालगाडी
Previous Post

दुधानंतर आता अमूलचं सेंद्रीय पीठ! पुढच्या टप्प्यात डाळीही विकणार!!

Next Post

टाटा मोटर्स फोर्ड कंपनीचा भारतातील बंद पडलेला उत्पादन प्रकल्प ताब्यात घेणार!

Next Post
Tata Motors

टाटा मोटर्स फोर्ड कंपनीचा भारतातील बंद पडलेला उत्पादन प्रकल्प ताब्यात घेणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!