Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अण्णा हजारेंना महागाईविरोधात जागं करण्यासाठी थेट राळेगणसिद्धीत आंदोलन!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Somnath Kashid And Anna Hazare

मुक्तपीठ टीम

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आतापर्यंत अनेकदा आंदोलनं आणि उपोषणं केली आहेत. उपोषणाच्या माध्यमातून त्यांनी सरकारवर दबाव आणला. २०१४च्या ऐतिहासिक सत्तांतरासाठी त्यांची आंदोलनंही एक कारण असल्याचं मानलं जातं. मात्र, सध्या महागाईमुळे होरपळणाऱ्या जनतेच्या जीवनामरणाच्या प्रश्नांवर अण्णा हजारे यांनी कोणतीही भूमिका घेतलेली नाही. यामुळे अण्णा हजारे यांच्याविरोधात राळेगणसिद्धीत आंदोलन करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ काशिद यांनी दिला आहे.

अण्णा हजारे शांत कसे काय आहेत?

  • मागील दोन लोकसभा निवडणुकीत भाजपाने मतदारांना दिलेली आश्वासने पाळली नाहीत.
  • त्याशिवाय, महागाईतही प्रचंड वाढ झाली आहे.
  • सामान्यांना मोठा त्रास होत असूनही अण्णा हजारे यांनी एक शब्दही केंद्र सरकारविरोधात काढला नाही.
  • त्यामुळे राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारेंविरोधात ‘अण्णा उठो’ आंदोलन करण्यात येणार आहे.
  • घरगुती वापराच्या एलपीजी गॅसची दरवाढ, इंधनासह खाद्यतेलाची होत असलेली दरवाढ, त्यातच खाद्यान्नांची होत असलेली दरवाढ यामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे.
  • महागाई विरोधात सर्वसामान्यांमध्ये मोठा आक्रोश असून सरकारविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
  • जनता महागाईत होरपळत असताना अण्णा हजारे शांत कसे काय आहेत?
  • अण्णा हजारे हे झोपले असतील तर त्यांना झोपेतून उठवण्याची आवश्यकता आहे.
  • अण्णा हजारेंनी जनतेसाठी महागाईविरोधात जनआंदोलन सुरू करण्याची गरज आहे.
  • असे मुद्दे काशिद यांच्यावतीने मांडण्यात येत आहेत.

वयोमानानुसार, प्रकृतीमुळे अण्णा हजारे आंदोलन करू शकत नाही!

  • केंद्रात भाजपाचे सरकार आल्यानंतर अण्णा हजारे यांनी सरकारविरोधात भूमिका घेतली नसल्याचा आरोप करण्यात येतो.
  • युपीए-२ च्या कार्यकाळात भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून अण्णा हजारे आणि इतरांनी मोठे आंदोलन उभारले होते.
  • त्याच्या परिणामी काँग्रेस सरकार विरोधात जनमत तयार झाले, असे म्हटले जाते.
  • तर, वाढत्या वयोमानानुसार, प्रकृतीच्या कारणांमुळे अण्णा हजारे आंदोलन करू शकत नसल्याचे त्यांच्या समर्थकांनी सांगितले.
  • पण त्याचवेळी ते राज्यातील सरकारला मात्र इशारे देताना दिसतात, हेही सांगितले जाते.

Tags: agitationanna hazareinflationRalegansiddhiSomnath Kashidअण्णा हजारेआंदोलनमहागाईराळेगणसिद्धीसोमनाथ काशिद
Previous Post

पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या रघुनाथ नेत्रालयाचे खासदार शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन

Next Post

काश्मिरमधील फुटिरतावादी यासिन मलिक दोषी, दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे सिद्ध!

Next Post
Yasin Malik

काश्मिरमधील फुटिरतावादी यासिन मलिक दोषी, दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे सिद्ध!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!