मुक्तपीठ टीम
व्हॉट्सअॅप हे जगभरात वापरले जाणारे सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे. व्हॉट्सअॅपने आता एक नवीन अपडेट जारी केला आहे, ज्या अंतर्गत आपण मोठा ग्रुप बनवू शकतो. हे अपडेट सर्वांशी कनेक्ट राहण्यास मदत करते. व्हॉट्सअॅप आपल्या प्लॅटफॉर्मवर रोज नवनवीन फिचर्स जोडत आहे. या नवीन फिचरमुळे, यूजर्सचा अनुभव अधिक चांगला होतो आणि नवीन मेंबर्स देखील जोडले जातात. सध्या, व्हॉट्सअॅपच्या कोणत्याही ग्रुपमध्ये ५१२ मेंबर्स जोडले जाऊ शकतात. या अपडेटनंतर, कोणत्याही ग्रुपमध्ये १०२४ सदस्य जोडू शकाल.
नवीन व्हॉट्सअॅप अपडेटसाठी चाचणी सुरू…
- व्हॉट्सअॅपने आपल्या प्लॅटफॉर्मवर हे फिचर जोडण्याची तयारी सुरू केली आहे.
- व्हॉट्सअॅप ग्रुपवर पूर्वी २५६ मेंबर्स जोडले जाऊ शकत होते पण नंतर कंपनीने ते बदलले आणि सध्या कोणत्याही ग्रुपमध्ये ५१२ मेंबर्स जोडले जाऊ शकतात.
- व्हॉट्सअॅपने काही दिवसांपूर्वी हे फिचर प्लॅटफॉर्मवर जोडले आहे.
- या फिचरसह, कंपनी एका ऑडिओ कॉलवर ३२ लोकांना जोडण्याची तयारी करत आहे.
- हे आगामी फिचर्स अॅंड्रॉईड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मवर दिले जाणार आहेत.
व्हॉट्सअॅपचे नवीन अपडेट कसे तपासायचे?
- व्हॉट्सअॅपचे हे नवीन अपडेट मिळाले आहे की नाही हे कसे तपासायचे? यासाठी फक्त व्हॉट्सअॅप अकाऊंटमधून एक नवीन ग्रुप तयार करायचा आहे ज्यामध्ये तुम्ही ५१२ पेक्षा जास्त सदस्य जोडू शकता.
- दुसरा मार्ग म्हणजे तुम्ही तुमच्या जुन्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये नवीन सदस्य जोडून व्हाट्सअॅपचे अपग्रेड देखील शोधू शकता.
- तसेच, व्हॉट्सअॅपवर अनेक नवीन फिचर्सची बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती, ज्यामध्ये पोल, अवतार, एडिट, व्हॉइस स्टेटस अपडेट सारखे फीचर्स आहेत.