मुक्तपीठ टीम
ट्विटर-फेसबुक नंतर आता ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी अॅमेझॉनमध्ये हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. अॅमेझाॅन अंदाजे १० हजार लोकांची कर्मचारी कपात करण्याची शक्यता आहे. काॅर्पोरेट आणि तंत्रज्ञान क्षेत्रात ही कर्मचारी कपात होऊ शकते. गेल्या काही दिवसांपासून अॅमेझॉन आर्थिक संकटाचा सामना करत असल्याने नोकर कपातीचा निर्णय घेतला असल्याचे मिळालेल्या माहितीतून स्पष्ट होत आहे.
‘Amazon’च्या ‘या’ विभागांमध्ये होणार कपात…
- अॅमेझॉनच्या ज्या विभागातील नोकऱ्यांमध्ये कपात केली जाईल त्यामध्ये अॅमेझॉनची डिव्हाइस संघटन, रिटेल विभाग आणि एचआर विभाग यांचा समावेश आहे.
- अॅमेझॉनच्या इतिहासातील ही सर्वात मोठी टाळेबंदी असेल.
- Amazonमध्ये एकूण कपात करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या १० हजारच्या आसपास असेल तर ही Amazon च्या इतिहासातील सर्वात मोठी टाळेबंदी मानली जाईल.
अॅमेझॉन जगभरात १.६ दशलक्षाहून अधिक लोकांना रोजगार देते. गेल्या वर्षी ३१ डिसेंबरपर्यंत अॅमेझाॅनमध्ये जवळजवळ १६ लाखांहून अधिक कर्मचारी पूर्ण वेळ आणि अर्धवेळ काम करत होते. नुकतेच, कंपनीने यापुढे नवीन नोकरभरती बंद करण्यात येणार असल्याचे सुचित केले होते.
अॅमेझॉनने कर्मचारी कपातीबाबत काय म्हटले?
- अॅमेझाॅनवर सर्वाधिक वस्तूंची विक्री ही सुट्टीच्या काळात होते. . यंदाच्या वर्षी अॅमेझाॅनच्या विक्रीत घट झाली आहे.
- वस्तूंच्या वाढत्या किंमतींमुळे ग्राहकांकडे पैसे खर्च करण्याची क्षमता नाही.
- त्यामुळे कंपनीला कर्मचारी कपातीशिवाय पर्याय नाही.
अॅमेझॉनने सर्वाधिक उत्पन्न कमावले होते. असे असतानाही गेल्या २० वर्षांममध्ये सर्वांत कमी तोटा याच काळात झाल्याचे समोर आले आहे. अॅमेझॉनने एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत जवळजवळ ८० हजार लोकांना कामावरून काढून टाकले. यामध्ये बहुतेक कर्मचारी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर काम करत होते.