Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गुजरात निवडणूक: श्रीकृष्णाच्या द्वारकेत का फुलतं फक्त कमळच?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
BJP Dwarka

मुक्तपीठ टीम

गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी पूर्ण ताकद लावली आहे. राज्यातील सत्ताधारी भाजपसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. द्वारका विधानसभा जागा ही देखील महत्त्वाच्या विधानसभा जागांपैकी एक आहे. द्वारका ही जागा भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो. २००२, २००७, २०१२ आणि २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार जिंकून आले. आता यावर्षी भाजपाला आपला गड राखण्यात यश येत का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

द्वारका भाजपाचा बालेकिल्ला

  • द्वारका विधानसभा पूर्णपणे भाजपाचा मजबूत बालेकिल्ला मानला जातो.
  • २००२, २००७, २०१२ आणि २०१७ या विधानसभा निवडणुकीत या जागेवर भाजपाचे कमळ फुलले.
  • द्वारका विधानसभा जागा गुजरातमधील देवभूमी दुर्वका जिल्ह्यात येते.
  • पबुभा विरंभा माणेक हे भाजपाच्या तिकिटावर आमदार आहेत.
  • तर २००२ पूर्वीच्या निवडणुकीत या विधानसभा जागेवर माणेक यांचेच वर्चस्व होते.

गेल्या ३२ वर्षांपासून माणेक यांचाच विजय-

  • गुजरातच्या निवडणुकीत यावेळीही भाजपाने पबुभा विरंभा माणेक यांना उमेदवारी दिली आहे.
  • मात्र, यावेळी आम आदमी पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने येथे अटीतटीची लढत होऊ शकते, असे मानले जात आहे.
  • २०१७ च्या निवडणुकीत द्वारकामध्ये मतदानाची टक्केवारी ४७.२५ होती.
  • २०१७ मध्ये विरंभा माणेक यांनी भाजपाच्या तिकिटावर काँग्रेसचे उमेदवार अहिर मेरामण मरखी यांचा पराभव केला.
  • माणेक यांनी मारखी यांचा ५७३९ मतांनी पराभव केला.
  • गेल्या निवडणुकीत अनेक अधिक उमेदवारांनी आपले नशीब आजमावले होते, मात्र भाजपचाच उमेदवार विजयी झाला होता.
  • गेल्या ३२ वर्षांपासून माणेक यांना कोणीही पराभूत करू शकलेले नाही.

माणेक हे पुजारी कुटुंबातील –

  • पबुभा विरंभा माणेक हे पुरोहित कुटुंबातील आहेत.
  • १९९० मध्ये त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि तेव्हापासून ते कधीही निवडणूक हरले नाहीत.
  • द्वारका ही जागा गेल्या १० वर्षांपासून भाजपाकडे आहे, तर पबुभा विरंभा माणेक यांच्याकडे ३२ वर्षांपासून आहे.
  • माणेक यांनी पहिल्या तीन निवडणुका अपक्ष म्हणून जिंकल्या, नंतर ते काँग्रेसमध्ये गेले.
  • नंतर २०१२ आणि २०१७ च्या निवडणुका भाजपाच्या तिकिटावर जिंकल्या.

Tags: DwarkaGujrat Assembly Electionगुजरात विधानसभा निवडणूकद्वारकापबुभा विरंभा माणेक
Previous Post

देशाच्या कानाकोपऱ्यात चौथ्या बाल सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ

Next Post

फेसबुक, ट्विटरनंतर आता अॅमेझॉनमध्ये १०हजार कर्मचारी कपात! काय झालंय टेक कंपन्यांना?

Next Post
Amazon

फेसबुक, ट्विटरनंतर आता अॅमेझॉनमध्ये १०हजार कर्मचारी कपात! काय झालंय टेक कंपन्यांना?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!