मुक्तपीठ टीम
मनसेने राज ठाकरे यांच्या आदेशाने ३ मे रोजी भोंगा अजानविरोधी हनुमान चालिसा आंदोलन जाहीर केले आहे. मुंबईतील कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी कडक पवित्रा स्वीकारला आहे. आंदोलनासाठी परवानगी मागणाऱ्या मनसे नेत्यांना पोलिसांनी नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे. मनसे विद्यार्थी सेनेचे नेते चेतन पेडणेकर यांना अशीच नोटीस रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी बजावल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.
अशी आहे पोलिसांनी मनसे नेत्यांना बजावलेली नोटीस…
कलम १४९ फौ. द.प्र.सं. अन्वये नोटीस
जा.क्र. 2013/ वपोनि/ रअकि/ २२
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
र.अ.कि.मार्ग पो. ठाणे, मुंबई.
दिनांक: – २ ९/ ०४/ २०२२.
प्रति ,
चेतन पेडणेकर – उपाध्यक्ष, मनविसे
बीडीडी चाल 99
शिवडी
ज्याअर्धी आपण दिलेल्या निवेदनावरून दि .०३ / ०५ / २०२२ रोजी महाराष्ट्र नवनिर्मान सेना या पक्षातर्फे अक्षय तृतीया या सणाच्या शुभमुहुर्तावर टाकेश्चर हनुमान मंदीर, टी.जे रोड, शिवडी, मुंबई याठीकाणी महाआरती करण्यास तसेच दि.०४ / ०५ / २०२२ रोजी हनुमान चालीसा पठण करणे व त्यासाठी ध्वनीक्षेपक लावण्याची परवानगी मिळणे बाबत र.अ.कि मार्ग पोलीस ठाणेस बिनती अर्ज सादर केला असल्याबाबतची माहिती मिळाली आहे.
मुंबई पोलिसांकडून १४९ ची नोटीस.. pic.twitter.com/p7TGRAq4Ww
— CHETAN PEDNEKAR (@chetan_mnvs) April 30, 2022
ज्याअर्थी, मा. पोलीस आयुक्त, बृन्हमुंबई यांचेकडुन बृन्हमुंबई शहरात मानवी जिवीतास, आरोग्यास तसेच सुरक्षीततेला धोका पोहचेल अशी कोणतीही कृती करण्यास बंदी आदेश क सि.पी/ ११ ( ६ )/ए.पी.७०१ (०४)/ २०२२ दि .०१/ ०४/ २०२२ च्या अन्वये दि .१०/ ०४/ २०२२ रोजी ०१:०० वाजल्यापासून ते दि .०९/ ०५ / २०२२ च्या रात्रौ २४:०० वाजे पर्यंत प्रतीबंधक आदेश जारी करण्यात आले आहेत.
आपणास सदर नोटीसद्वारे सुचीत करण्यात येते की, नमुद परीसर हा रहादारीचा व जास्त गर्दीचा असल्या कारणामुळे आपणाकडून उपस्थित पदाधिकारी यांचेकडुन आयोजीत कार्यक्रमा दरम्यान प्रश्नोभक घोषणा सुचना इत्यादीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडुन कायदा व सुव्यवस्था प्रसंग निर्माण झाल्यास आपण सर्वस्वी जबाबदार असाल याची नोंद घ्यावी. नमुद कार्यक्रमाचे आयोजन हे बंदीस्त जागेत करण्यात यावे तसेच नमुद कार्यक्रमाकरीता संबंधित महानगर पालीका विभागाकडून परवानगी घेण्यात यावी.
त्याअर्थी, मी लिलाधर पाटील, पोलीस निरीक्षक, र.अ.कि.मार्ग पो. ठाणे , मुंबई मला फौ. द.प्र.म. कलम १४ ९ प्रमाणे मिळालेल्या अधिकारानुसार आपणांस सूचित करतो की, सदर कार्यक्रमादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी आपल्यावर व आपल्या सहकाऱ्यावर राहील आणि आपल्या व आपल्या सहकान्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल व सदरची नोटीस आपले विरुध्द पुरावा म्हणुन मा. न्यायालयात सादर करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
(सिलाधर पाटील)
पोलीस निरीक्षक,
र.अ.कि.मार्ग पोलीस ठाणे, मुंबई