Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अंगणवाडी सेविकांसाठीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा महाराष्ट्रात कसा लाभ होणार?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Supreme Court (2)

मुक्तपीठ टीम

आजवर गल्ली ते दिल्ली कोणत्याही सरकारने ज्याची दखल घेतली नाही ते सर्वोच्च न्यायालयानं केलं आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या तळागाळातील कामाचं महत्त्वावर जोर देत, त्यांच्या दुरावस्थेची गंभीर दखल घेण्याची वेळ आली आहे, असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक आणि अजय रस्तोगी यांच्या खंडपीठाने सरकारला बजावलं आहे. त्यांनी अंगणवाडी सेविका/मदतनीस या त्यांच्या अतोनात कष्टांमुळे १९७२च्या पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी कायद्यानुसार ग्रॅच्युइटी मिळण्यास पात्र आहेत असे मतही मांडले आहे.

सर्वोच्च न्यायालयाकडून अंगणवाडी सेविकांच्या कष्टाची दखल

  • दोन्ही न्यायमूर्तींनी आपल्या निकालात काही मतं मांडली आहेत.
  • अंगणवाडी सेविका/मदतनीस यांना ६ महिने ते ६ वर्षे वयोगटातील बालके, गरोदर स्त्रिया तसेच स्तनदा माता यांना अन्न सुरक्षा पुरविण्याची महत्त्वाची कामे सोपवण्यात आली आहेत.
  • पूर्व प्राथमितक शिक्षण देण्यातही त्यांचा सहभाग असतो.
  • त्यांच्यावरील अनेक जबाबदाऱ्यांसाठी त्यांना अत्यंत तुटपुंजे मानधन आणि तुटपुंजे लाभ दिले जात आहेत.

कोणत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल?

मणिबेन मगनभाई भरिया विरुद्ध जिल्हा विकास अधिकारी दाहोड या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने २५ एप्रिल रोजी हा निकाल दिला.

न्यायमूर्तींचे महत्वाचे निरीक्षण

  • दोन्ही न्यायमूर्तींनी नोंदवलेल्या निरीक्षणानुसार, केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी समाजाला अशा महत्त्वाच्या सेवा देणे अपेक्षित असलेल्या अंगणवाडी सेविका/मदतनीस यांच्या दुर्दशेची गांभीर्याने दखल घेण्याची वेळ आली आहे.
  • न्यायमूर्ती ओक यांच्या मते ‘मजुरी’ ची व्याख्या खूप विस्तृत आहे.
  • याचा अर्थ ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्याने कमावलेले सर्व वेतन. अशा प्रकारे, अंगणवाडी सेविका/मदतनीस यांना दिले जाणारे मानधन देखील वेतनाच्या व्याख्येत समाविष्ट केले जाईल. अंगणवाडी सेविका/मदतनीस राज्य सरकार १९७२चा कायदा लागू असलेल्या आस्थापनांमध्ये वेतनासाठी नियुक्त करत असल्याने, कायद्यानुसार कर्मचारी आहेत.
  • अंगणवाडी सेविका/मदतनीस यांना दिलेली नोकरी ही अर्धवेळ नोकरी आहे, असा युक्तिवाद मान्य करणे अशक्य असल्याचेही त्यांनी सांगितले. तो पूर्णवेळ रोजगार आहे.

न्यायमूर्तींची अंगणवाडी सेविकांसाठी महत्वाची मतं

  • “भारत सरकारने ३ एप्रिल १९९७च्या अधिसूचनेद्वारे शैक्षणिक संस्थांना १९७२ कायद्याच्या कलम १ च्या उप-कलम (३) च्या खंड (सी) अंतर्गत आस्थापना म्हणून अधिसूचित केले आहे. अंगणवाडी केंद्रांमध्ये ३ ते ६ वयोगटातील मुलांसाठी पूर्व प्राथमिक शिक्षणाचा उपक्रमही राबविला जातो.
  • हा निव्वळ शैक्षणिक उपक्रम आहे.
  • शिकवण्याचे काम अंगणवाडी सेविका / मदतनीस करतात. राज्य सरकार RTE कायद्याच्या कलम ११नुसार अंगणवाडी केंद्रांमध्ये बालवाडी चालवत आहे.
  • वर नोंदवलेल्या कारणांमुळे, मला कोणतीही शंका नाही की १९९७च्या पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी कायद्यानुसार अंगणवाडी केंद्रांना आणि त्या बदल्यात अंगणवाडी सेविका/मदतनीसांना लागू होईल.
  • अंगणवाडी सेविका/मदतनीस यांच्या समस्यांकडे लक्ष दिले पाहिजे.
  • सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यांना नियमित वेतन आणि राज्यातील कर्मचाऱ्यांना उपलब्ध असलेल्या इतर सवलतींपासून वंचित ठेवले जाते.
  • पगाराच्या ऐवजी, त्यांना फक्त तथाकथित तुटपुंजे मानधन (किमान वेतनापेक्षा खूपच कमी) मिळते.

Tags: anganwadi sevikaMaharashtraSupreme Courtअंगणवाडी सेविकाग्रॅच्युइटीमहाराष्ट्रसर्वोच्च न्यायालय
Previous Post

भोंगा आंदोलन: मुंबई पोलिसांच्या मनसे नेत्यांना नोटीस!

Next Post

राज्यात १५५ नवे रुग्ण, १३५ बरे! मुंबई ९४, पुणे २५, ठाणे १७

Next Post
maharashtra corona report

राज्यात १५५ नवे रुग्ण, १३५ बरे! मुंबई ९४, पुणे २५, ठाणे १७

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!