मुक्तपीठ टीम
नोकियाने भारतात आपला नवीन एंट्री लेव्हल स्मार्टफोन C31 लॉंच केला आहे. हा स्मार्टफोन बजेट सेगमेंटच्या खरेदीदारांना लक्षात घेऊन लॉंच करण्यात आला आहे. जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, नोकियाचा सी ३१ हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. भारतात हा स्मार्टफोन अनेक कंपन्यांशी स्पर्धा करण्यास सज्ज असेल.
नोकिया सी ३१ स्मार्टफोन फिचर्स…
- नोकिया सी ३१ स्मार्टफोनमध्ये ६.७१ इंचाचा मोठा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे.
- नोकिया ने या स्मार्टफोनमध्ये Unisoc चिपसेट वापरला आहे.
- हा स्मार्टफोन 3GB/4GB रॅम पर्याय आणि 32GB/64GB अंतर्गत स्टोरेज पर्यायामध्ये उपलब्ध आहे.
- नोकिया सी ३१च्या मागील बाजूस १३ एमपी प्रायमरी कॅमेरा, २ एमपी मॅक्रो लेन्स आणि २ एमपी डेप्थ शूटर उपलब्ध आहेत.
- त्याच वेळी, कंपनीने ५ एमपी सेल्फी कॅमेरा दिला आहे. या स्मार्टफोनची एक खास गोष्ट म्हणजे त्याची बॅटरी आहे.
- कंपनीने या फोनच्या बॅटरीमध्ये ५,०५० एमएएच बॅटरी दिली आहे आणि ती १० डब्ल्यू फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीलाही सपोर्ट करते.
कंपनीचा विश्वास आहे की, हा स्मार्टफोन एकदा चार्ज करून ३ दिवस वापरू येईल. हा नोकिया स्मार्टफोन अॅंड्रॉईड १२सह येतो आणि तो अॅंड्रॉईड १३वर अपडेट केला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन २ स्टोरेज पर्यायांसह येतो. या फोनची किंमत ९ हजार ९९९ रुपये असेल, तर कंपनीने 4GB रॅम व्हेरिएंटची किंमत १० हजार ९९९ रुपये ठेवली आहे. या फोनची खरेदी लवकरच ऑनलाइन आणि ऑफलाइन माध्यमातून करता येईल.