Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गंगेच्या पाण्यात कोरोना विषाणू नाहीत! केंद्र सरकारनं नेमलेल्या समितीचा अहवाल!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
ganga

मुक्तपीठ टीम

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत गंगेत मोठ्या प्रमाणात मृतदेह आढळल्याच्या बातम्यांनी खळबळ माजली होती. गंगेच्या प्रवाहात मृतदेह फेकले जात असतात, पण कोरोना संकट काळात खूपच जास्त मृतदेह आढळल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्याची गंभीर दखल घेत केंद्रीय जलशक्ती मंत्रालयानं लखनौतील संस्थेला गंगेच्या पाण्याची विषाणू तपासणी करण्याचे आदेश दिले होते. या अभ्यासानुसार गंगेच्या पाण्यात कोरोनाचा विषाणू आढळलेले नाहीत.

 

जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगाद्वारे वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर), इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टॉक्सिकोलॉजी रिसर्च (आयआयटीआर), लखनऊ, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा अभ्यास केला गेला. गंगा नदीच्या उत्तरप्रदेश, बिहार या दोन राज्यांमधील विविध घाटांवर नमुने घेण्यात आले होते. .

 

गंगा नदीच्या पुढील भागातून घेतले नमुने

  • कन्नौज
  • उन्नाव
  • कानपूर
  • हमीरपूर
  • अलाहाबाद
  • वाराणसी
  • बलिया
  • बक्सर
  • गाजीपूर
  • पाटणा
  • छपरा

 

अभ्यासात काय आढळले?

  • गंगा नदीच्या पाण्याच्या अभ्यासाचा अधिकृत अहवाल अद्याप जाहीर झालेला नाही.
  • गोळा केलेल्या गंगेच्या पाण्याच्या कोणत्याही नमुन्यांमध्ये सार्स-सीओव्ही २ म्हणजेच कोरोना विषाणूचे अंश सापडलेले नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
  • व्हायरोलॉजिकल अभ्यासासाठी पाण्याच्या नमुन्यांमधून विषाणूचे आरएनए काढले गेले.
  • त्यामुळे जलाशयातील व्हायरल लोड नक्की करण्यासाठी आरटी-पीसीआर चाचणी करणे शक्य झाले.

 

कोरोना मृतदेह आढळले त्या ठिकाणी तपासणी

  • पहिल्यांदा मृतदेह बक्सरच्या घाटावर गंगेमध्ये वाहताना दिसल्याच्या बातम्या आल्या.
  • यामुळेच आयआयटीआर अॅनालिस्टच्या पथकाने प्रथम बक्सरकडून गंगेच्या पाण्याचे नमुना घेतले.
  • बक्सरबरोबरच पथकाने पाटणा, भोजपूर आणि सारण येथूनही नमुने घेतले आहेत.
  • बिहार राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळदेखील गंगेच्या पाण्यातील बदलांची चौकशी करीत आहे.
  • हे प्रकरण विषाणूशी संबंधित आहे, म्हणून हे काम आयआयटीआरला देण्यात आले आहे.

गंगा घाटांवरील पाण्याची तपासणी

  • आयआयटीआरची तीन सदस्यांची टीम बिहारमध्ये गंगाच्या पाण्याचे नमुने घेण्यासाठी आली होती.
  • बिहार राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकासह पथकाने विविध जिल्ह्यांमधील गंगा घाटांवर जाऊन स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नमुने गोळा केले.
  • या पथकाने १ जूनला बक्सरमध्ये गंगेच्या पाण्याचे नमुने आणि ५ जून रोजी पाटणा, भोजपूर आणि सारण येथे घेतले.
  • नमुने तपासल्यानंतर गंगेच्या पाण्यात कोरोना विषाणू आहे की नाही ते तज्ज्ञांनी तपासले.

हे ही वाचा : 

कोरोना मृतदेहांमुळे गंगा संसर्गित तर झाली नाही? केंद्र सरकारने नेमली समिती

 


Tags: coronadeadbodiesganga riverकोरोनागंगामृतदेह
Previous Post

“बँकांनी पीक कर्ज वाटपाला गती द्यावी”

Next Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’च्या टिमचे कौतुक

Next Post
majha award

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून 'महाराष्ट्राची हास्य जत्रा'च्या टिमचे कौतुक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!