मुक्तपीठ टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाशी लढा देत गावाला कोरोनामुक्त करणाऱ्या तीन सरपंचाचे जाहीर कौतुक केले. तसेच अशा गावांना सरकारतर्फे ५० लाखांचा पुरस्कारही जाहीर केला. त्या गावांचं कौतुकच, पण पुण्यातील राजगुरूनगरमधील एक गाव असंही आहे ज्याने कोरोनाला गावाच्या वेशीवरही येऊ दिलेले नाही. गडद नावाचं हे गाव आजवर कोरोनामुक्त राहू शकले आहे.
गेल्या वर्षी कोरोनाची साथ सुरु होताच सरपंच रामदास गबाजी शिंदे यांनी गावकऱ्यांना कोरोनाबद्दल समजवले. गडदच्या सर्व गावकऱ्यांनी एकमुखानं निर्धार केला तो कोरोनाला गावापासून दूरच राखण्याचा. त्यासाठी गावाने प्रत्येकाने मास्क, सॅनिटायझरचा वापर केलाच पाहिजे, हे नियम कडकपणे पाळले. गावात कोरोना संसर्ग दूर ठेवण्यासाठी एकमेकांमध्ये अंतर राखण्याचा नियमही सर्वांनी पाळला. पाळला जात असतो.
गडद गावाची लोकसंख्या ही बाराशे आहे. पण गावातील शेकडो मुंबई, पुण्यात कामासाठी गेले आहेत. बाहेर राहणारे गावकरी गावी परतले की त्यांनी सक्तीने गावच्या शाळेत चौदा दिवस मुक्काम करावा लागतो. त्यानंतरच त्यांना गावात घरी जाता येतं. इतर गावकऱ्यांमध्ये मिसळता येते. त्यासाठी गावातील शाळेत विलगीकरण कक्ष उभारण्यात आला होता. त्यावर जिल्हा परिषदेचे अधिकारी देखरेख ठेवत असत.
पहिल्या लाटेतील यशस्वी पद्धतच दुसऱ्या लाटेतही वापरली गेली. गावकऱ्यांनी सरपंचांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंशिस्त पाळली. त्यामुळे गावाक कोरोनाला शिरकाव करताच आला नाही. यापुढेही काहीही झाले तरी गावकऱ्यांनी ठरवले, आहे शिस्तीची साथ सोडायची नाही, साथीला थारा द्यायचा नाही.
पाहा व्हिडीओ: