Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मराठा आरक्षणाबाबत अशोक चव्हाणांची भूमिका “तोंडात गोड अन् मनात खोड!”

भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांचा आरोप

June 3, 2021
in घडलं-बिघडलं
0
Ashish shelar

मुक्तपीठ टीम

मराठा आरक्षण विषयाचा पुर्ण विचका करण्याचे काम महा विकास आघाडीने केले. आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री अशोक चव्हाण यांची भूमिका म्हणजे तोंडात गोड अन् मनात खोड अशी आहे, असा आरोप भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी आज येथे केला.

 

मराठा आरक्षणाबाबत राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीबाबतीत संवाद साधण्यासाठी भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार चार दिवसाच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. आज सकाळी पुण्यतिथी निमित्ताने परळीला गोपीनाथ गडावर जाऊन लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीस अभिवादन केले. तसेच भाजप नेत्या पंकजा मुंडे, प्रितम मुंडे आणि कुटुंबिय यांची निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर नांदेडकडे प्रयाण केले.

 

नांदेड येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, शहर अध्यक्ष प्रवीण साले, महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा प्रणिताताई चिखलीकर, डाँ. संतुकराव हंबर्डे उपस्थितीत होते.

 

यावेळी आमदार अँड आशिष शेलार म्हणाले की, मराठा आरक्षण विषयात मंत्री अशोक चव्हाण यांची भूमिका संशयास्पद आहे. त्यांच्या कथनी आणि करनी यामध्ये फरक आहे. आरक्षण टिकणार असे सांगत होते आणि प्रत्यक्षात सर्वोच्च न्यायालयात गायकवाड आयोगाच्या बाजूने युक्तिवादच केला नाही. गायकवाड आयोगाने समाजाचे संपूर्ण मागासलेपण सिध्द केले पण त्यातील परिशिष्ट इंग्रजी अनुवादासह न्यायालयात मांडली नाहीत. सर्वांना हातात हात घालून चालले पाहिजे असे म्हणायचे पण मराठा समाजाच्या प्रतिनिधींची समन्वय बैठकच घेतली नाही. त्यावर प्रतिक्रिया आल्यावर बैठका घेतल्या. चांगले वकील दिले पण वकिलांना सरकारने माहितीच द्यायची नाही. न्यायालयात वकीलांना हे सांगावे लागले. १०२ व्या घटनादुरुस्तीवर केंद्राने भूमिका स्पष्ट करा म्हणायचे आणि जेव्हा केंद्राने भूमिका मांडली तेव्हा त्याचे समर्थन न करता आता इंद्रा सहानी निकालावर बोलायचे, आरक्षणाचा कायदा करा असे सांगत राज्यपाल महोदयांना भेटायचे त्याच दिवशी काँग्रेसचे शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटून आरक्षण नंतर मिळाले तरी चालेल पण सवलती द्या असे म्हणायचे. त्यामुळे अशोक चव्हाण यांची संपूर्ण भूमिका ही तोंडात गोड अन् मनात खोड अशीच आहे, अशा शब्दांत अशोक चव्हाण यांचा अँड शेलार यांनी समाचार घेतला.

 

तसेच अशोक चव्हाण यांनी भूमिका मांडताना वेळोवेळी दिखाऊपणा केला. आज ते इंद्रा सहानी निकालाचा फेरविचार करा असे केंद्र सरकारला सांगत आहेत मग काँग्रेसचे सरकार केंद्रात असताना, स्वतः मुख्यमंत्री असताना अशोक चव्हाण यांनी हे का केले नाही? केंद्राने ठराव आणि कायदा करुन आरक्षण दयावे असे अशोक चव्हाण सांगत आहेत. तुम्ही मुख्यमंत्री असताना, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना का केला नाही ठराव? राज्यपालांना पत्र लिहून राष्ट्रपतींनी आरक्षण द्यावे अशी मागणी करीत आहेत. मग कायदा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश न पाळता आरक्षण दिले तर ते टिकेल का? असे प्रश्न उपस्थितीत करुन आमदार अँड आशिष शेलार यांनी अशोक चव्हाण यांच्या एकुणच कार्यपद्धती व भूमिकांवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले.

 


Tags: Ashok Chavanbjp ashish shelarMaratha Reservationआशिष शेलारमराठा आरक्षणमुख्यमंत्री उद्धव ठाकरेसार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
Previous Post

“एक खिडकी योजनेद्वारे बँकांनी कृषीक्षेत्राला तातडीने वित्तपुरवठा करावा”

Next Post

कोरोनाला गावापासून दूरच ठेवणारं गाव! आजवर एकही रुग्ण नाही!!

Next Post
corona

कोरोनाला गावापासून दूरच ठेवणारं गाव! आजवर एकही रुग्ण नाही!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!