मुक्तपीठ टीम
बिहारमधील महिला आयएएस अधिकारी हरजोत कौर यांनी एका कार्यक्रमादरम्यान वादग्रस्त वक्तव्य केले. मुलींना सॅनिटरी नॅपकिन्स मोफत पुरविण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हरजोत कौर म्हणाल्या की, आज आपण सॅनिटरी पॅड मागत आहात, उद्या आपण सरकारकडून मोफत कपडे किंवा कंडोम देखील मागाल. याप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने त्यांच्याविरोधात नोटीस बजावली आहे. त्याचवेळी महिला अधिकाऱ्याने आपल्या वक्तव्यावर माफी मागितली आहे. तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महिला आयएएस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
काय म्हणाले नितीश कुमार?
- आम्ही एका एक एक गोष्ट पाहत आहोत.
- चुकीचे आढळल्यास कारवाई केली जाईल.
- आज आम्हाला सकाळीच कळले की त्या महिला आयएएस अधिकारी हरजोत कौर असे काही बोलले आहे ज्यामुळे तेथे उपस्थित महिला नाराज झाल्या आहेत.
- आम्हाला कळताच आम्ही तात्काळ घटनेची चौकशी केली.
- आता तातडीने बैठक घेऊन त्यावर लक्ष घातले जाईल.
- प्रश्नच उद्भवणार नाही.
- महिलांना आम्ही नेहमीच मदत करत आलो आहोत.
- दिल्लीच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले.
- त्यात काही चूक आढळल्यास कारवाई केली जाईल.
राष्ट्रीय महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली असून महिला आयएएस अधिकारी हरजोत कौर यांच्याकडून त्यांच्या वक्तव्यावर लेखी स्पष्टीकरण मागितले आहे. हरजोत कौर यांनी आपल्या वक्तव्याबद्दल लेखी माफी मागितली आहे. त्यांनी आपल्या माफीनामा पत्रात लिहिले की, “माझ्या बोलण्याने कोणत्याही मुलीच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागते. माझा उद्देश कोणाचाही अपमान करण्याचा किंवा कोणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता तर मुलींना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा होता.