मुक्तपीठ टीम
देशभरात पसरलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेवर कारवाई करणाऱ्या एनआयएने याला ‘ऑपरेशन ऑक्टोपस’ असे नाव दिले आहे. या अंतर्गत २२ सप्टेंबर रोजी एनआयएने ११ राज्यांमधील पीएफआयच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले. यावेळी १०६ पीएफआयच्या लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान एनआयएने या प्रकरणी आपला अहवाल प्रसिद्ध केला असून, यात ही संघटना तरुणांना लष्कर-ए-तैयबा आणि इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS) या दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी प्रवृत्त करते असा आरोप करण्यात आला आहे.
एनआयए स्पेशल कोर्टासमोर सादर करण्यात आलेल्या रिमांड अहवालात १० जणांच्या कोठडीची मागणी केली आहे. एनआयए आपल्या अहवालात म्हटले आहे की, जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांमधून आक्षेपार्ह साहित्य सापडले आहे. कट्टरपंथी इस्लामिक संघटनेने तरुणांना लष्कर-ए-तैयबा आणि इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS) या दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी प्रवृत्त करतात.
ऑपरेशन ऑक्टोपस
- एनआयएने म्हटले आहे की पीएफआयच्या जागेवर टाकलेल्या छाप्याला ऑपरेशन ऑक्टोपस असे नाव देण्यात आले होते ज्यात एकूण ३०० अधिकारी सामील होते.
- या कारवाईत पीएफआयच्या १०६ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ईडी आणि एनआयएच्या म्हणण्यानुसार, पीएफआयचे सदस्य देशविरोधी कारवायांमध्ये गुंतले होते.
- एनआयएने पाच गुन्हे दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
- हे सर्व टेरर फंडिंग, तरुणांसाठी प्रशिक्षण शिबिरे आणि लोकांमध्ये कट्टरता पसरवण्यासाठी केले जात आहे.
- महाविद्यालयाच्या प्राध्यापकाचा हात कापण्यासारखे गुन्हेगारी हिंसक कृत्य पीएफआयने केले असल्याचे तपास संस्थेने म्हटले आहे.
गुप्तचर विभागाने महाराष्ट्रात अलर्ट जारी केला होता…
- महाराष्ट्रात, गुप्तचर विभागाने एक अलर्ट जारी केला होता, त्यानुसार पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू आहे.
ज्यासाठी औरंगाबाद आणि जालन्यात या संस्थेत सदस्यांची भरती केली जात आहे.