मुक्तपीठ टीम
अमरावतीतील उमेश कोल्हे हत्येचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली असून आठव्याचा शोध सुरू आहे. मात्र एनआयएला उदयपूरप्रमाणेच अमरावतीच्या भीषण घटनेत आरोपी आणि दहशतवादी गटांशी संबंध असल्याचा पुरावा अद्याप सापडलेला नाही. एनआयएकडून सध्या सर्व पैलू तपासले जात आहेत. या हत्येच्या प्रकरणात UAPA लावण्यात आल्याने दहशतवादी कनेक्शन असल्याचा एनआयएला संशय असल्याचे उघड आहे, त्यामुळे ते शोधण्यासाठी कसून प्रयत्न सुरु आहेत.
दहशतवादी कनेक्शन अद्याप सापडलं नाही!
- तपास यंत्रणा या घटनेशी संबंधित आरोपींचे संबंध आणि कट्टरपंथी गटांशी असलेल्या संबंधांबाबत वेगवेगळ्या पैलूंचा सातत्याने तपास करत आहेत.
- येत्या काही दिवसांत अमरावतीच्या घटनेशी संबंधित काही महत्त्वाची माहिती उघड होऊ शकते.
- विशेष म्हणजे, अमरावती प्रकरणी तपास यंत्रणेने (एनआयए) शनिवारी रात्री उशिरा एफआयआर नोंदवला होता.
- एनआयएच्या अधिकाऱ्याने सांगितले की, उदयपूर आणि अमरावतीमधील हत्या ISIS शैलीतील हत्या होत्या.
- हे अमानुष दहशतवादी कृत्य असल्याचे दिसते, परंतु अद्याप कोणत्याही दहशतवादी गटाच्या सहभागाचे पुरावे मिळालेले नाहीत.
या घटना देशात हिंसाचार भडकवण्याच्या देशव्यापी कटाचा भाग आहेत का? की हा आंतरराष्ट्रीय कट आहे, याचाही तपास एनआयए करत आहे. हत्येप्रकरणी एनआयएने अटक आरोपींविरुद्ध यूएपीएच्या गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एनआयएने या आरोपींविरुद्ध UAPA कलमांतर्गत गुन्हाही नोंदवला आहे.
एनआयए प्रमुखांची गृहमंत्री अमित शाहांशी चर्चा
- उदयपूर आणि अमरावती हत्याकांडाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेचे संचालक दिनकर गुप्ता यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.
- एनआयए प्रमुख अमित शहा यांची भेट घेण्यासाठी गृह मंत्रालयात पोहोचले.
- सुमारे ३५ मिनिटांच्या बैठकीनंतर त्यांनी सांगितले की, या प्रकरणाची अद्याप चौकशी सुरू आहे.
- अशा प्रकरणांबाबत तपास यंत्रणा जाहीरपणे काहीही बोलू शकत नाही.
- अमरावती आणि उदयपूर घटनेचा संबंध असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, आता तपास सुरू आहे.