Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शरीरात यूरिक अॅसिड वाढलं…तर समस्या अनेक! ताणतणाव आणि खाण्यात काय टाळावं?

July 6, 2022
in आरोग्य
0
digestion

मुक्तपीठ टीम

सध्याच्या काळात आरोग्याची काळजी आणि त्याची योग्य ठेवण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी योगा, व्यायाम आणि अन्न सेवनावर योग्य नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्वाचे आहो. आता युरिक अॅसिड वाढण्याच्या समस्येने अनेकांना त्रासलेले अनेकदा दिसले असेल. या परिस्थितीत, तीव्र वेदनांसह प्रभावित सांधे हलविण्यास त्रास होऊ शकतो. शरीर जेव्हा प्युरीन्स नावाच्या पदार्थांचे विघटन करते तेव्हा हे अॅसिड तयार होते. प्युरिन हे सामान्यतः शरीरात तयार केले जातात आणि विशिष्ट पदार्थ आणि पेयांमध्ये देखील आढळतात. युरिक अॅसिडचे शरीरात प्रमाण वाढल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात.

शरीरातील किडनी मूत्राद्वारे यूरिक अॅसिड फिल्टर करत असतात. मात्र, जर आहारात भरपूर प्युरिनचा समावेश केला तर रक्तातील युरिक अॅसिडचे प्रमाण वाढू लागते. या समस्येची वेळीच काळजी घेतली नाही तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, यूरिक अॅसिड वाढण्याची समस्या टाळण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. हा

युरिक अॅसिड टाळण्यासाठी काही सोपे उपाय

१. तणाव

  • काही लोक तणावग्रस्त असतात त्यामुळे त्यांच्या शरिरात यूरिक अॅसिड वाढण्याची शक्यता जास्त असते.
  • तणावाच्या स्थितीचा त्यावर थेट परिणाम होत नाही, मात्र तणाव, निद्रानाश आणि व्यायामाचा अभाव यामुळे शरीरात जळजळ वाढते.
  • जळजळ हे यूरिक अॅसिड वाढवणाऱ्या घटकांपैकी एक मानले जाते.
  • ताणतणावांवर मर्यादा घालून, यूरिक ऍसिडसह इतर अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्य समस्यांवर नियंत्रण ठेवता येते.

२. आहारातील प्रथिने कमी करा

  • प्रथिनांचे सेवन शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात असले तरी, त्याचा अतिरेक शरीरात यूरिक अॅसिड वाढण्यास कारणीभूत ठरू शकतो.
  • जास्त प्रथिनेयुक्त आहामुळे मूत्रात यूरिक अॅसिडचे उत्सर्जन वाढवते. याशिवाय सर्व लोकांनी प्युरीन असलेल्या पदार्थांचे सेवन कमी करावे.
  • काही प्रकारचे मांस, सीफूड आणि फुलकोबी, हिरवे वाटाणे, सोयाबीन आणि मशरूममध्ये प्युरीन्स जास्त असू शकतात.

३. साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण

  • जास्त साखर असलेल्या गोष्टींचे सेवन केल्याने तुमच्यामध्ये मधुमेहाचा धोका तर वाढतोच पण युरिक अॅसिडचे प्रमाण वाढवणारा घटकही वाढतो.
  • गोड पदार्थांचे जास्त सेवन केल्याने देखील यूरिक अॅसिड वाढण्याचा धोका वाढू शकतो.
  • प्रक्रिया केलेले आणि साठवून ठेवलेले खाद्यपदार्थही तुमच्या समस्या वाढवू शकतात, त्यांच्यापासूनही दूर ठेवले पाहिजे.

युरिक अॅसिडपासून मुक्ततेसाठी पाणी पिणे फार महत्वाचे

  • आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जे यूरिक अॅसिड वाढण्याच्या समस्येने त्रस्त आहेत किंवा ज्यांना त्याचा धोका जास्त आहे, त्यांच्यासाठी पाणी पिणे हा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग असू शकतो.
  • जास्त प्रमाणात द्रवपदार्थ घेतल्याने मूत्रपिंडांना यूरिक ऍसिड जलदपणे बाहेर काढणे सोपे होते.
  • दिवसातून किमान ३-४ लिटर पाणी पिण्याची सवय लावा.
  • वेळोवेळी काही घोट पाणी पिण्याची सवय लावून तुम्ही अनेक प्रकारच्या समस्या दूर ठेवू शकता.

Tags: healthmuktpeethuric acidआरोग्यमुक्तपीठयूरिक अॅसिड
Previous Post

एकनाथ शिंदे आमदारांनंतर पदाधिकाऱ्यांमागे…उद्धव ठाकरेंची रणनीती काय?

Next Post

अमरावती हत्येचं दहशतवादी कनेक्शन शोधण्यासाठी NIAचे कसून प्रयत्न!

Next Post
Umesh kolhe And NIA

अमरावती हत्येचं दहशतवादी कनेक्शन शोधण्यासाठी NIAचे कसून प्रयत्न!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!