मुक्तपीठ टीम
रिलायन्स समुहाचे मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील घराबाहेर सापडलेली स्फोटकांच्या गाडीच्या तपासप्रकरणी एनआयएने आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात अनेक स्फोटक आरोपांची मालिका आहे. त्यात सचिन वाझे आणि साथीदारांचा पुन्हा पूर्वीचे वलय मिळवण्याबरोबरच अंबानींकडून मोठी खंडणी वसुलीचा कट असल्याचा आरोप आहे.
एनआयएच्या आरोपपत्रात काय?
- एनआयएने सचिन वाझे आणि साथीदारांवर गंभीर आरोप ठेवले आहेत. एनआयएने आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, २५ फेब्रुवारीला रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्यामागे मोठा कट होता.
- सचिन वाझेला पुन्हा भुतकाळातील प्रसिद्धी आणि महत्वाचं वलय मिळवायचं होतं.
- तसेच वाझे आणि त्याचे साथीदार मुकेश अंबानींकडून मोठी खंडणी रक्कम गोळा करण्याची तयारी करत होते.
- अंबानी यांच्या घराबाहेर आणि नंतर जे काही घडले ते त्यांच्या कटाचा भाग होते.
सचिन वाझेनंच प्रमुख भूमिका निभावली
- एनआयएने आपल्या आरोपपत्रात दावा केला आहे की सचिन वाझेने स्वतः स्कॉर्पिओ वाहनात जिलेटिन ठेवले होते.
- तो ती गाडी स्वत: कार चालवत होता.
- त्याने या वाहनात धमकीचा कागदही सोडला होता, जो मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांना उद्देशून होता.
दहशतवादी कारवायांचा आरोप
- एनआयएने आपल्या आरोपपत्रात लिहिले आहे की, पोलीस खात्याशी संबंधित असलेले सचिन वाजे, प्रदीप शर्मा आणि सुनील माने हे जणू दहशतवादी टोळीचे सदस्य होते.
- त्यांनी त्यांच्या कृतीतून दहशत पसरवण्याचे काम केले. एनआयएने या सर्वांवर यूएपीएची कलमे लावली आहेत.
- यूपीए हा कायदा केवळ दहशतवादी कारवायांसाठी लागू आहे.
- अँटिलिया प्रकरणात एनआयएने सचिन वाजे आणि इतरांविरोधात 10,000 पानांचे आरोपपत्र दाखल केले
वाझेने कट कसा अमलात आणला?
- ज्या स्कॉर्पियो वाहनात स्फोटके ठेवली होती ती हिरेन मनसुखने सचिन वाझेला विकली होती.
- याचा अर्थ, ही कार अधिकृतपणे सचिन वाझे यांच्या मालकीची होती.
- विशेष गोष्ट म्हणजे या स्कॉर्पिओ कारच्या मागे एक इनोव्हा वाहन होते, ती सीआययूची सचिन वाझेची अधिकृत कार होती, जी सीआययूच्या ड्रायव्हरने चालवली होती.
- सचिन वाझेने त्याला या प्रकरणात अंधारात ठेवले असल्याचे ड्रायव्हरने एनआयएला सांगितले.
- वाझे त्याला एवढेच म्हणाले की, हे CIU चे गुप्त ऑपरेशन चालू आहे.
- सचिन वाझे काही अंतरावर गेले आणि आपले सर्व कपडे बदलले आणि ड्रायव्हरलाही कपडे बदलायला लावले.