मुक्तपीठ टीम
गेल्या अनेक महिन्यांपासून उद्योगपती मुकेश अंबानींच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवल्याचे प्रकरण खूप गाजत आहे. पुढे ती गाडी सचिन वाझेनेच ठेवून प्रकरण घडवल्याचं उघड झालं. तपास अधिकारीच आरोपी झाला. पण आता एनआयएने मुंबईच्या न्यायालयात सादर केलेल्या दहा हजार पानांच्या आरोपपत्रातून वाझेचा हेतूही स्पष्ट झाला आहे. अँटिलियाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेऊन वाझेला त्याची गतकाळातील उत्तम तपास अधिकारी ही ओळख आणि त्यातूनही महत्वाचे म्हणजे ते महत्व परत मिळवायचे होते. पण त्याचं बिंग फुटलं.
ओळख परत मिळवण्यासाठी वाझेचा खटाटोप
- सचिन वाझेला आपली जुनी ओळख परत मिळवायची होती.
- स्फोटकांच्या कारचा तपास करुन, उत्तम तपास अधिकारी म्हणून पुन्हा लौकिक मिळवायाचा होता.
- ते प्रकरण जगभर चर्चेत यावे म्हणून त्याने धोका पत्करत उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराजवळील परिसराची निवड केली.
- मात्र भलतंच घडत गेलं आणि सचिन वाझेच जेलमध्ये गेला.
वाझेचा घटनाक्रम
- नव्वदच्या दशकातील एन्काऊंटर स्पेशलिस्ट अशी त्याची ओळख होती.
- सचिन वाझे जवळपास १६ वर्षांनंतर २०२० मध्ये पोलिस दलात परतले होते.
- सचिन वाझे हा ख्वाजा युनूस एन्काउंटर प्रकरणात निलंबित झाला होता.
- मात्र आघाडी सत्तेत आल्यानंतर २०२० मध्ये तो परत पोलीस दलात दाखल झाला.
- वाझेला थेट क्राईम इन्वेस्टीगेशन युनिट अर्थात CIU चे प्रमुख पद मिळालं.
- सध्या सचिन वाझे जेलमध्ये आहे.
वाझेचा कट त्याच्यावरच उलटला! साथीदारही अडकले!
- मनसुख हिरेन हत्याप्रकरणात त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे.
- मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर २४ फेब्रुवारी २०२० च्या रात्री स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ उभी करण्यात आली होती.
- ही गाडी सचिन वाझेचा मित्र मनसुख हिरेन यांचीच होती.
- पुढे त्याचाही खून झाला, तोही आरोप वाझे आणि साथीदारांवर आहे.