Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सर्वोच्च न्यायालयाकडून सीबीआयची झाडाझडती! तपास करता त्याचे होते काय, दाखवा रिपोर्ट कार्ड!

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
sc & cbi

मुक्तपीठ टीम

सीबीआय तपास म्हटलं की सध्या वाद हा ठरलेलाच. पूर्वीपासूनच सीबीआय म्हणजे सत्ताधारी पक्ष हे त्यांच्या फायद्यासाठी वापरली जाणारी तपास यंत्रणा असल्याचे आरोप होत असतात. सीबीआयच्या याच कार्यशैलीची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयानेही घेतली आहे. सीबीआयला त्यांनी केलेल्या प्रकरणांचे पुढे काय झाले, ते विचारत तपासातील यशाचे प्रमाण मांडण्यास सांगितले आहे. एकप्रकारे सीबीआयकडे त्यांचे रिपोर्ट कार्डच मागण्यात आल्याचे मानले जात आहे.

 

उशिराच्या अपिलामुळे सर्वोच्च न्यायालयाकडून दखल

  • सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडून खटले चालवण्यात येणाऱ्या विलंबाचा हवाला देत न्यायालयीन प्रकरणांमध्ये एजन्सीच्या तपासातील यशाचा डेटा मागितला आहे.
  • सर्वोच्च न्यायालय सीबीआयच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्याची शक्यता आहे.
  • खरंतर, एका प्रकरणात सीबीआयने ५४२ दिवसांच्या विलंबानंतर अपील दाखल केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.
  • सीबीआयच्या कामकाजाचे आणि त्याच्या कामगिरीचे विश्लेषण करण्याचा निर्णय घेतला.

 

मिळालेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय संचालकांना निर्देश दिले आहेत की, ज्या प्रकरणांमध्ये एजन्सी आरोपींना ट्रायल कोर्ट आणि हायकोर्टात दोषी ठरवण्यात यशस्वी झाली आहे, त्यांची संख्या कोर्टासमोर मांडावी. सीबीआयचे संचालक कायदेशीर कार्यवाहीसंदर्भात विभागाला बळकटी देण्यासाठी काय पावले उचलत आहेत, असेही न्यायालयाने विचारले आहे.

 

सीबीआयच्या न्यायालयीन कामगिरीचा आढावा

  • न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती एम सुंदरेश या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने असे निरीक्षण नोंदवले की एजन्सीने केवळ गुन्हा नोंदवणे आणि तपास करणे पुरेसे नाही, तर खटला यशस्वीपणे चालवला गेला आहे की नाही, याची खात्री करावी.
  • न्यायालयाने सीबीआय कडून सध्या हाताळल्या जाणाऱ्या आणि यशस्वीरित्या पूर्ण झालेल्या प्रकरणांची संपूर्ण माहिती मागितली आहे. सीबीआयला न्यायालयांमध्ये किती प्रकरणे प्रलंबित आहेत आणि किती काळ आहेत याचा तपशील देण्यास सांगितले आहे.

 

सर्वोच्च न्यायालय करणार सीबीआयच्या कामगिरीचे विश्लेषण

  • सर्वोच्च न्यायालयाने आता एक पाऊल पुढे टाकले आहे आणि इतर प्रकरणांमध्येही एजन्सीच्या कामगिरीचे विश्लेषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • सर्वोच्च न्यायालयाच्या या खंडपीठाने सांगितले की, आम्ही सीबीआयच्या यशाचे प्रमाण तपासू.

Tags: CBISupreme Courtसर्वोच्च न्यायालयसीबीआय
Previous Post

गतकाळातील महत्व परत मिळवण्यासाठी सचिन वाझेचा ‘स्फोटक’ कट!

Next Post

सर्वोच्च न्यायालयाची न्यायाधीश नेमणुकांची विक्रमी शिफारस! १२ उच्च न्यायालयांमध्ये ६८ नावांची शिफारस!!

Next Post
sc

सर्वोच्च न्यायालयाची न्यायाधीश नेमणुकांची विक्रमी शिफारस! १२ उच्च न्यायालयांमध्ये ६८ नावांची शिफारस!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!