Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘करेक्ट कार्यक्रम’ करण्याची भाषा करणाऱ्या राष्ट्रवादीलाच राजू शेट्टींचा करेक्ट कार्यक्रमाचा इशारा

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
shetti & patil

मुक्तपीठ टीम

शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी परंपरागत राजकीय शत्रू असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसशी केलेली मैत्री अल्पजीवी ठरली आहे. गेले काही दिवस ते सातत्याने सत्ताधारी आघाडीवर टीका करत आहेत. त्यातही त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना थेट लक्ष्यही केले. बहुधा त्यामुळेच शेट्टी यांची विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य नियुक्ती करावी ही यापूर्वी करण्यात आलेली शिफारस महाविकास आघाडी सरकारने मागे घेतल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीकडून याविषयी अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. राजू शेट्टी यांनी मात्र, नाराजी जाहीर केली असून राष्ट्रवादी आणि स्वाभिमानीत एक करार जाला होता. तो पाळायचा की धारदार खंजीर खुपसायचा हे राष्ट्रवादीने ठरवायचं आहे. आता मीदेखील करेक्ट कार्यक्रम करणार असा इशारा त्यांनी राष्ट्रवादीला दिला आहे.

करार पाळायचा की खंजीर खुपसायचा ते राष्ट्रवादीने ठरवावे!

  • सध्या राजू शेट्टी पंचगंगा परिक्रमेवर आहेत.
  • या परिक्रमेत पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा मांडत सरकारविरोधात संताप व्यक्त करतानाच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही हल्लाबोल केला आहे.
  • त्यांनी कडक शब्दात शेट्टींनी आपल्या भावना मांडल्या आहेत.
  • लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी आणि स्वाभिमानीत करार झाला होता.
  • तो पाळायचा किंवा धारदार खंजीर खुपसायचा हे राष्ट्रवादीने ठरवायचं आहे.
  • आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही काय त्यांच्या दारात भीक मागायला गेलो नव्हतो. त्यामुळे काही झालं तरी मला आमदार करा नाहीतर जीव सोडणार, असं मी रडणार नाही.
  • गेल्या अडीच वर्षांपासून मी कोणत्याच पदावर नाही. तरीही काम करतोय.
  • लोकांच्या मनातील माझे स्थान कोणी हिरावून घेऊ शकत नाही.

 

राजू शेट्टींची पंचगंगा परिक्रमा कशासाठी?

  • राजू शेट्टी यांनी पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी बुधवारपासून पंचगंगा परिक्रमा सुरू केली आहे.
  • ही परिक्रमा नरसोबाच्या वाडीत संपेल.
  • त्यानंतर ५ सप्टेंबर रोजी राजू शेट्टी पूरग्रस्तांसह जलसमाधीही घेणार आहे.
  • पुरामुळे सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान झालं आहे.
  • शेतकऱ्यांची संपूर्ण शेती वाहून गेली.
  • स्थानिकांची घरं पाण्यात बुडाली.
  • अनेकांचे संसार मातीमोल झाले.
  • सरकारकडून पूरग्रस्तांना अद्यापही मदत मिळालेली नाही.
  • त्यामुळे या सर्वांना सरकारने तातडीने आर्थिक मदत द्यावी.
  • तसेच २०१९च्या जीआरप्रमाणे पूरग्रस्तांना मदत देण्यात यावी.
  • कुणाला वेठीस धरण्याचा आमचा हेतू नाही.

Tags: jayant patilMVANCPRaju shettiजंयत पाटीलमहाविकास आघाडी सरकारराजू शेट्टीराष्ट्रवादी काँग्रेस
Previous Post

नागपूरमधील सरकारी मालकीच्या मिनी रत्न कंपनीत ४६ जागांसाठी भरती

Next Post

गतकाळातील महत्व परत मिळवण्यासाठी सचिन वाझेचा ‘स्फोटक’ कट!

Next Post
sachin waze

गतकाळातील महत्व परत मिळवण्यासाठी सचिन वाझेचा ‘स्फोटक’ कट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!