Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मनानं श्रीमंत जोडपं…आहेर आणि वरात खर्चातून गरजूंना अन्नदान

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
newly wed couple

मुक्तपीठ टीम

लग्न तर काय सर्वच करतात. आपलं लग्न आगळं वेगळं असावं म्हणून वाट्टेल तसा पैसाही बरेच उधळतात. पण आपल्या संसाराची सुरूवात करताना दुसऱ्यांचे जीवन सुखी होण्यासाठी प्रयत्न करणारे कमीच. आजची चांगली बातमी अशा एका जगावेगळ्या जोडप्याची. आपल्याला मिळालेल्या आहेरातून आणि लग्नाची वरात न काढता त्याच पैशांतून फुटपाथवर संसार मांडलेल्या ६० कुटुंबियांना धान्यदानाचे सत्कार्य करून लग्नसोहळ्यातही सामाजिक बांधिलकी जपण्याचं आदर्श उदाहरण लोकांसमोर ठेवलंय प्रभादेवीच्या प्रफुल्ल गावडेने.

 

“तुम्ही मला जो लग्नाचा आहेर देणार आहात, तो मंडळाच्या सामाजिक कार्यासाठी दिलात तर मला जास्त आनंद होईल,” असा मेसेज आपल्या मित्रांना लग्नाच्या आदल्या दिवशी टाकला आणि आपल्या वरातीचा प्लॅन रद्द करत त्याचा खर्चही प्रफुल्लने मंडळाला दिला. गरीब आणि गरजू लोकांप्रती असलेली त्याची भावना पाहून त्याच्या मित्रमंडळींनी त्याच्याच इच्छेनुसार आहेर आणि वरातीच्या जमा झालेल्या पैशातून गरीबांसाठी धान्य विकत घेतले आणि लग्नबंधनात अडकल्यानंतर गावडे नवदाम्पत्यांच्याच हस्ते वडाळा पश्चिमेला फुटपाथवर राहात असलेल्या ६० गरीब कुटुंबियांना धान्यदान करण्याचे अनोखे सत्कार्य साकारले.

 

newly wed couple

गेले ५० दिवस प्रभादेवीच्या सौरभ मित्र मंडळाच्या माध्यमातून गरीब-गरजूंच्या मुखी अन्नाचे दोन घास लागावेत म्हणून प्रफुल्ल गावडे धडपडत होता. अन्नदान करत होता. कितीही अन्नदान केलं तरी ते कमीच होतं. लोकांची मागणीही धान्याचीच असायची. पण ती पूर्ण करण्याची क्षमता ना मंडळाची होती ना प्रफुल्ल गावडेची. त्यामुळे धान्यदान करता येत नव्हते. पण गरजूंना किमान १५ दिवसांचे तरी धान्य द्यायचे हा विचार त्याच्या मनात सारखा घोळत होता. मंडळाच्या या सत्कार्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तिंकडून धान्याची मदतही मिळू लागली होती. मंडळाच्या माध्यमातून देह विक्रय करणाऱ्या महिला असो किंवा किन्नर असो, किंवा फुटपाथवरचे गरीब असो किंवा रूग्णालयांबाहेरचे त्रस्त नातेवाईक आणि रूग्ण. मंडळाने या सर्वांना आपल्यापरीने अन्नदानही केले. पण हे अन्नदान करताना अनेकांची फक्त एक मागणी असायची ती म्हणजे धान्याची.

 

दुसरीकडे लॉकडाऊनमुळे अनेकदा लांबणीवर पडलेल्या प्रफुल्लच्या लग्नाची तयारीही जोरात सुरू होती. मित्रांचा लाडका असलेल्या प्रफुल्लला त्याच्या गरजेची महत्त्वाची वस्तू आहेर म्हणून देण्याची तयारी त्याचे मित्र करत होते. ही गोष्ट त्याच्यापर्यंत पोहोचली आणि त्यांच्या भावस्पर्शी मनाला हे खटकलं. माझ्यापेक्षा अधिक गरज त्या असंख्य गरीब-गरजू कुटुंबांना आहे, ज्यांच्याकडे खाण्यासाठी दोनवेळचे अन्नही नाही. मला आहेर नको, तेच पैसे तुम्ही गरीबांच्या मुखी अन्नाचे दोन घास लागावेत म्हणून धडपडणाऱ्या आपल्या मंडळाच्या उपक्रमासाठी वापरावेत, अशी इच्छा प्रफुल्लने व्यक्त करून त्याच पैशातून गरीब कुटुंबियांना धान्यदान करा, असे स्पष्ट संकेतही दिले.

newly wed couple

एवढेच नव्हे तर त्याने आपल्या वरातीचा वायफळ खर्चही मंडळाला दिला. गरीबांप्रती असलेलं प्रेम पाहून त्याच्या मित्र मंडळींनीही जमा झालेल्या आहेराच्या रकेमतून तात्काळ तांदूळ, गहूपीळ, तूरडाळ, मूगडाळ, साखर, पोहे आणि तेल खरेदी केले आणि वडाळा पश्चिमेला रफिक किडवई मार्गावरील फुटपाथवर रहात असलेल्या ६० कुटुंबियांना धान्य देण्याचे निश्चित केले. दिवसभर चाललेल्या लग्नाच्या सर्व पवित्र विधी आणि स्वागत समारंभानंतर सायंकाळी गावडे दाम्पत्यांनी गरीब कुटुंबांना धान्यदानाचे सत्कार्य करून त्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा मिळवत आपल्या नव्या आयुष्याची सुरूवात केली.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: mumbaiprabhadeviअन्नदानगावडे दाम्पत्यप्रभादेवीवडाळासौरभ मित्र मंडळ
Previous Post

तरुण संशोधक अभिजीत कदमच्या आणखी २ पेटंटना ऑस्ट्रेलियात मान्यता

Next Post

व्हिडीओ शॉपिंगसाठी यूट्युबची पसंती ‘सिमसिम’ भारतीय स्टार्टअपला!

Next Post
youtube-simsim

व्हिडीओ शॉपिंगसाठी यूट्युबची पसंती ‘सिमसिम’ भारतीय स्टार्टअपला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!