Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्राचे सौंदर्य आणि वारसा दाखवण्यासाठी ५० नवीन राज्य पर्यटक मार्गदर्शक सज्ज

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
maharashtra

मुक्तपीठ टीम

ऑनलाइन इन्क्रेडिबल इंडिया टुरिस्ट फॅसिलिटेटर (IITF) प्रमाणन कार्यक्रमात उत्तीर्ण झालेल्या ५० यशस्वी उमेदवारांना महाराष्ट्र पर्यटन विभागाद्वारे प्रमाणपत्रांचे वितरण करून पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पर्यटन संचालक मिलिंद बोरीकर तसेच सहसंचालक डॉ.धनंजय सावळकर आदी यावेळी उपस्थित होते. सह्याद्री अतिथीगृह येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी उपस्थित टूर मार्गदर्शकांचे आणि प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या उमेदवारांचे अभिनंदन करून प्रधान सचिव वल्सा नायर सिंह म्हणाल्या, हे उमेदवार आधीच शहरस्तरीय टूर गाईड आहेत. त्यांना प्रशिक्षणाद्वारे आता राज्य स्तरावर पदोन्नती दिली जात आहे. पात्र आणि प्रमाणित पर्यटक मार्गदर्शकांची ही नवीन तुकडी पर्यटन स्थळांच्या माहितीचा प्रसार करण्यासाठी आणि अधिकाधिक देशी आणि विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी त्यांची शैली आणि नवीन तंत्रे जोडून राज्याचे सौंदर्य प्रदर्शित करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पर्यटन संचालनालयाद्वारे चालवलेला हा उपक्रम प्रमाणित मार्गदर्शकांची कमतरता भरून काढेल. आवश्यक प्रशिक्षण आणि पार्श्वभूमी असलेले या नवीन पर्यटक मार्गदर्शकांच्या माध्यमातून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होण्याबरोबरच महाराष्ट्र पर्यटनाला चालना मिळेल. अशा फलदायी कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल पर्यटन संचालनालयाचे त्यांनी अभिनंदन केले.

पर्यटन संचालक मिलिंद बोरीकर यांनी प्रास्ताविक करताना सर्व प्रशिक्षित उमेदवारांची प्रशंसा करून आनंद व्यक्त केला. आतापर्यंत राज्यातील १५ वेगवेगळ्या ठिकाणी ऑफलाईन टूर गाईड प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला आहे. यामध्ये एकूण ४५० मार्गदर्शकांना प्रशिक्षण देण्यात आले असून ते सेवा बजावण्यासाठी सज्ज असल्याची माहिती त्यांनी दिली. तथापि, महाराष्ट्र पर्यटन विभागाकडून आयआयटीएफ सर्टिफिकेशन प्रोग्रामच्या यशस्वी उमेदवारांना एकदिवसीय प्रशिक्षण देण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे त्यांनी सांगितले.

नवीन उमेदवारांसाठी सह्याद्री अतिथीगृह येथे एक दिवसाचा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये उमेदवारांना जबाबदार, शाश्वत, वारसा आणि साहसी पर्यटन यावर प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणानंतर, महाराष्ट्रातील पर्यटनाच्या उपरोक्त विषयांवरील त्यांच्या ज्ञानाची चाचणी घेण्यात आली. त्यात ते उत्तीर्ण झाले. लवकरच ते राज्यस्तरावर टूर गाईडची कर्तव्ये पार पाडणार आहेत. या 50 उमेदवारांची अधिकृतपणे टूर मार्गदर्शक म्हणून घोषणा करण्यात आली असून ते महाराष्ट्रातील विविध पर्यटन स्थळांवर महाराष्ट्र पर्यटन प्रमाणित मार्गदर्शक म्हणून सेवा प्रदान करतील.

पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी आभार प्रदर्शन केले.

 


Tags: good newsIncredible India Tourist FacilitatorMaharashtra BeautyMaharashtra HeritagemuktpeethState Tourist Guideइन्क्रेडिबल इंडिया टुरिस्ट फॅसिलिटेटरघडलं-बिघडलंचांगली बातमीमहाराष्ट्र वारसामहाराष्ट्र सौंदर्यमुक्तपीठराज्य पर्यटक मार्गदर्शक
Previous Post

आता भारतात भविष्यातील धोके ओळखून वैद्यकीय सेवा! अणुहल्ला आणि रासायनिक अपघातातील पीडितांसाठी रुग्णालयं!

Next Post

कसाऱ्यात जिजाऊच्यावतीने हृदयविकार तपासणी शिबीर, गरजूंच्या आरोग्य रक्षणाचा उपक्रम

Next Post
Heart Disease Checkup Camp

कसाऱ्यात जिजाऊच्यावतीने हृदयविकार तपासणी शिबीर, गरजूंच्या आरोग्य रक्षणाचा उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!