Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता भारतात भविष्यातील धोके ओळखून वैद्यकीय सेवा! अणुहल्ला आणि रासायनिक अपघातातील पीडितांसाठी रुग्णालयं!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
zazzar aims, chennai stanley medical

मुक्तपीठ टीम

भारत सरकार हे नागरिकांच्या हितासाठी नेहमीच चांगले निर्णय घेते. सरकारच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आता एक महत्त्वाची आणि उत्तम सूचना जारी केली आहे. अणुहल्ला किंवा रासायनिक अपघातातील पीडितांसंबंधित हा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकारच्या दुर्घटना भविष्यात घडल्यास पीडितांना दोन नवीन विशेष वैद्यकीय केंद्रांमध्ये उपचार मिळतील.

zazzar aims, chennai stanley medical

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, केमिकल, बायोलॉजिकल, रेडिओलॉजिकल आणि न्यूक्लियर केंद्रे झज्जरमधील एम्स कॅम्पस आणि चेन्नईमधील स्टॅनले मेडिकल कॉलेजमध्ये स्थापन केली जातील. याचा प्रकल्प अहवाल एचएलएल इन्फ्रा टेक सर्व्हिसेसने आरोग्य आणि संरक्षण मंत्रालय, अणुऊर्जा विभाग, भाभा अणु संशोधन केंद्र यांसारख्या इतर संस्थांशी चर्चा करून तयार केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हरियाणातील झज्जर आणि चेन्नईमध्ये हे केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.

zazzar aims, chennai stanley medical

काही राज्यांमध्ये याची उपकेंद्रही उभारली जाणार

  • मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, उत्तर प्रदेश, झारखंड, राजस्थान, गुजरात आणि तामिळनाडूमध्ये सात सीबीआरएन वैद्यकीय व्यवस्थापन केंद्रे देखील स्थापन केली जातील.
  • हे अणुऊर्जा प्रकल्प आणि औद्योगिक अपघात किंवा दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता असलेल्या प्रमुख शहरांजवळ बांधले जातील, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

विशेष वैद्यकीय केंद्रांसाठी आरोग्य मंत्रालयाचे नियोजन

  • दीड वर्षात २३० कोटी रुपये खर्चून ही केंद्रे बांधली जाणार आहेत.
  • दोन्ही केंद्रांमध्ये ५०-५० खाटांची सुविधा असेल. यापैकी १६ खाटा आयसीयूसाठी, २० खाटा आयसोलेशनसाठी आणि १० खाटा ऑपरेशनपूर्व आणि पोस्ट ऑपरेशनसाठी असतील.
  • बोन-मॅरो प्रत्यारोपण केंद्रासाठी ४ खाटा निश्चित केल्या जातील.
  • सर्व केंद्रांवर रुग्णवाहिका सेवा असेल, बाधितांना संसर्गमुक्त करण्यासाठी गरम, थंड आणि रासायनिक स्नान उपलब्ध असेल.

Tags: अणुहल्ला अपघातकेंद्रीय आरोग्य मंत्रालयघडलं-बिघडलंचांगली बातमीचेन्नईभारतमुक्तपीठरासायनिक अपघातवैद्यकीय सेवा
Previous Post

राज्यात १७२३ नवे रुग्ण, १८४५ बरे! मुंबई ६२५, नाशिक ५८, नागपूर ६ नवे रुग्ण !!

Next Post

महाराष्ट्राचे सौंदर्य आणि वारसा दाखवण्यासाठी ५० नवीन राज्य पर्यटक मार्गदर्शक सज्ज

Next Post
maharashtra

महाराष्ट्राचे सौंदर्य आणि वारसा दाखवण्यासाठी ५० नवीन राज्य पर्यटक मार्गदर्शक सज्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!