मुक्तपीठ टीम
व्हॉट्सअॅपने गेल्या वर्षी एका फिचरची चाचणी सुरू केली होती. ज्यामध्ये कंपनीने सांगितले की, व्हॉट्सअॅपचे डेस्कटॉप यूजर्स फोनमध्ये इंटरनेट कनेक्शन नसतानाही मेसेज पाठवू आणि पाहू शकतील. सोप्या भाषेत सांगायचे तर, लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी फोनला इंटरनेटची गरज भासणार नाही. जवळजवळ ८ महिन्यांच्या चाचणीनंतर, व्हॉट्सअॅपने बीटा यूजर्ससाठी त्यांचे अपडेट जारी केले आहे. व्हॉट्सअॅप डेस्कटॉपचे बीटा यूजर्स आता फोन फ्लाइट मोडमध्ये ठेवूनही व्हॉट्सअॅप वापरू शकतात.
नवीन फिचर अॅक्टिव्ह करण्याची प्रक्रिया
- सर्व प्रथम, नवीन फिचर केवळ डेस्कटॉप यूजर्ससाठी आहे. जर डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅप वापरत असल्यास हे फिचर खूप उपयुक्त आहे.
- प्रथम व्हॉट्सअॅप अपडेट करा.
- आता हे फिचर अॅक्टिव्ह करण्यासाठी फोनच्या व्हॉट्सअॅप सेटिंगमध्ये जावे लागेल.
- त्यानंतर लिंक डिव्हायसेस या पर्यायावर क्लिक करा.
- आता मल्टी-डिव्हाइस बीटा चा पर्याय दिसेल. बीटा व्हर्जनमध्ये सामील होण्यासाठी त्यावर क्लिक करा. आता डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅप उघडा. यानंतर सेटिंग पूर्ण होईल.
- आता फोनला इंटरनेटविना लॅपटॉपवर व्हॉट्सअॅप वापरता येणार आहे. आता व्हॉट्सअॅप लॅपटॉपचे इंटरनेट वापरेल.
मल्टी डिव्हाइसचाही मिळणार सपोर्ट
- डेस्कटॉपच्या नवीन बीटा व्हर्जनसह, मल्टी-डिव्हाइस सपोर्ट देखील प्राप्त झाला आहे. याचा अर्थ असा आहे की चार वेगवेगळ्या डिव्हाइसवर समान व्हॉट्सअॅप अकाउंट वापरता येईल.
- तसेच, हे डिव्हाइस फक्त वेब व्हर्जनसह असेल म्हणजेच वेगवेगळ्या फोन अॅप्समध्ये व्हॉट्सअॅप वापरू शकणार नाही.
- मल्टी-डिव्हाइस फिचर वापरण्यासाठी, अनिवार्यप्रमाणे बीटामध्ये सामील होणे आवश्यक आहे.