मुक्तपीठ टीम
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने संसदेच्या हिवाळी अधिवेशनात दिलेल्या माहितीनुसार, सीबीएसई परीक्षांच्या पॅटर्नमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. शिक्षण मंत्रालयाने सांगितले की, २०२३ मध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या म्हणजेच सीबीएसई १०वीच्या परीक्षेतील किमान ४० टक्के प्रश्न आणि १२वीच्या परीक्षेतील ३० टक्के प्रश्न सक्षमतेवर आधारित असतील. बोर्डाच्या परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न वस्तुनिष्ठ प्रकार, रचनात्मक प्रतिसाद प्रकार, प्रतिपादन, तर्कवाद म्हणजेच तर्कशास्त्र आणि केस आधारित प्रश्न विचारले जातील.
असा असेल सीबीएसई नवीन परीक्षा पॅटर्न…
- केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांनी हिवाळी अधिवेशनात लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
- नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० च्या अनुषंगाने, सीबीएसई परीक्षांचा नमुना सुधारण्यासाठी इयत्ता १०वी आणि १२वी बोर्ड परीक्षांमध्ये योग्यता-आधारित प्रश्न सादर करणार आहे.
- या प्रश्नांमध्ये वस्तुनिष्ठ प्रकार, रचनात्मक प्रतिसाद प्रकार, प्रतिपादन, तर्क आणि केस आधारित प्रश्न यांसारख्या अनेक स्वरूपांचा समावेश आहे.
- शैक्षणिक सत्र २०२२-२३ मध्ये, इयत्ता १०वी बोर्डाच्या परीक्षेतील सुमारे ४० टक्के प्रश्न आणि १२ वीमधील सुमारे ३० टक्के प्रश्न गुणवत्तेवर आधारित आहेत.
१५ फेब्रुवारीपासून बोर्ड परीक्षा सुरू होण्याची शक्यता…
- १५ फेब्रुवारी २०२३ पासून शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता १०वी आणि १२वीच्या थिअरी परीक्षा सुरू होणार आहेत.
- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने अद्याप परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही.
- नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० लागू केल्यानंतर, सीबीएसईने संलग्न शाळांना शिक्षणाच्या पद्धतीबाबतच्या शिफारशींचे पालन करण्याचा सल्ला दिला होता.
- सक्षमतेवर आधारित शिक्षणाचा अवलंब, शैक्षणिक परिणामांचा अवलंब, कला एकात्मिक शिक्षण, क्रीडा एकात्मिक शिक्षण, कथा सांगणे इत्यादींवर भर देण्यात योणार आहे.