Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नववधूंसाठी एक रुपयात हेयर सेट, ३२० रुपयात मेकअप! भाड्याने कपडे!!

April 14, 2021
in चांगल्या बातम्या
0
surat

मुक्तपीठ टीम

 

प्रत्येक मुलीला नीट-नेटकं राहून नटायला आणि सजायला फार आवडते. विशेषत: नववधूंना, परंतु बर्‍याच वेळा पैशाच्या अडचणींमुळे काहींना या इच्छा पूर्ण करता येत नाहीत. इच्छा असूनही नववधूंना त्यांच्या मनाप्रमाणे सजता येत नाही, त्यांना महाग पार्लर परवडत नाही. त्या लक्षात घेऊन सुरत येथील ब्यूटीशियन केतन हिरपरा यांनी एक वेगळे पाऊल उचलले आहे. त्यांनी स्वत:चे पार्लर उघडले आहे, जिथे नववधू कमी किंमतीत या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. यासाठी त्यांना केवळ ३२० रुपये खर्च करावे लागतील. सुरतच्या बर्‍याच भागातील मुली आता त्यांच्या पार्लरमध्ये येतात. कमी दर ठेवूनही केतन यांना वर्षाकाठी ६ लाख रुपये उत्पन्न मिळत आहे.

 

केतन सांगतात की, “लग्नाच्या वेळी मुलींना सुंदर कपडे, मेक-अप आणि छान केशरचना करण्याची मनापासून इच्छा असते, परंतु ब्यूटी पार्लरमध्ये वधूचे मेकअप इतके महाग आहेत की, बर्‍याच मुलींना ते परवडत नाही. म्हणून मला वाटले की या मुलींसाठी काहीतरी केले पाहिजे. तीन वर्षांपूर्वी मी त्यावर काम करण्यास सुरुवात केली. वधूचे परफेक्ट मेकअप फक्त ३२० रुपयांमध्ये केला जातो. केशरचनेसाठी फक्त १ रुपये आकारले जातात. एवढेच नव्हे तर ते भाड्यावर ड्रेसदेखील देतात. ते सांगतात की, आमच्या येथून फक्त २५० रुपयात महागडे लेहंगे भाड्याने मिळतात. सर्वात खास गोष्ट अशी आहे की, भाड्याने दिलेले लग्नासाठी कपडे येथे एका फॅशन डिझायनरने बनवले आहेत. या प्रयत्नांमुळे, आमच्या संस्थेस आयएसओद्वारे देखील प्रमाणित केले गेले आहे ज्याचा आम्हाला फार अभिमान आहे.”

 

केतन हे काम गेली तीन वर्षे करत आहेत. ते म्हणतात की, त्यांनी फक्त एक रुपयांच्या किंमतीवर आजवर चार हजार मुलींचे केस सेट केले आहेत. यासह त्यांनी एक हजाराहून अधिक मुलींचे मेकअपही केले आहेत. केसांचा सेट आणि मेकअपबरोबरच केतन मुलींना ब्युटीशियनचे प्रशिक्षणही अगदी कमी शुल्कात देतात. त्यांनी आतापर्यंत ३५०-४०० मुलींना ब्युटिशियन म्हणून प्रशिक्षण दिले आहे. त्यांनी पाच मुलींना रोजगारही दिला आहे. त्यांच्या पार्लरमधून ब्यूटीशियनचा कोर्स केल्यावर त्या तिथे काम करतात आहेत.

 

केतन हिरपरा या कामामुळे खुश आहे. ते म्हणतात की, त्यां”च्या पार्लरमध्ये नेहमीच मुली आणि महिलांची गर्दी असते. त्या आमच्या कामाचे कौतुकही करतात. यामुळे आम्हाला केवळ सुरतच नाही तर संपूर्ण गुजरातमध्ये मान्यता मिळाली आहे. आता देशातील लोकही आम्हाला ओळखू लागले आहेत.”

 

पाहा व्हिडीओ:


Tags: suratकेतन हिरपरासुरत
Previous Post

नर्सची भन्नाट ‘ग्लोव्ह्ज’ डोकॅलिटी, कोरोना रुग्णांना घरची उब जाणवली!

Next Post

“आरोग्य व्यवस्था सुधारण्यास प्राधान्य द्या! अनेक छोट्या घटकांचं काय?”- देवेंद्र फडणवीस

Next Post
Devendra Fadnavis-11

"आरोग्य व्यवस्था सुधारण्यास प्राधान्य द्या! अनेक छोट्या घटकांचं काय?"- देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!