मुक्तपीठ टीम
प्रत्येक मुलीला नीट-नेटकं राहून नटायला आणि सजायला फार आवडते. विशेषत: नववधूंना, परंतु बर्याच वेळा पैशाच्या अडचणींमुळे काहींना या इच्छा पूर्ण करता येत नाहीत. इच्छा असूनही नववधूंना त्यांच्या मनाप्रमाणे सजता येत नाही, त्यांना महाग पार्लर परवडत नाही. त्या लक्षात घेऊन सुरत येथील ब्यूटीशियन केतन हिरपरा यांनी एक वेगळे पाऊल उचलले आहे. त्यांनी स्वत:चे पार्लर उघडले आहे, जिथे नववधू कमी किंमतीत या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. यासाठी त्यांना केवळ ३२० रुपये खर्च करावे लागतील. सुरतच्या बर्याच भागातील मुली आता त्यांच्या पार्लरमध्ये येतात. कमी दर ठेवूनही केतन यांना वर्षाकाठी ६ लाख रुपये उत्पन्न मिळत आहे.
केतन सांगतात की, “लग्नाच्या वेळी मुलींना सुंदर कपडे, मेक-अप आणि छान केशरचना करण्याची मनापासून इच्छा असते, परंतु ब्यूटी पार्लरमध्ये वधूचे मेकअप इतके महाग आहेत की, बर्याच मुलींना ते परवडत नाही. म्हणून मला वाटले की या मुलींसाठी काहीतरी केले पाहिजे. तीन वर्षांपूर्वी मी त्यावर काम करण्यास सुरुवात केली. वधूचे परफेक्ट मेकअप फक्त ३२० रुपयांमध्ये केला जातो. केशरचनेसाठी फक्त १ रुपये आकारले जातात. एवढेच नव्हे तर ते भाड्यावर ड्रेसदेखील देतात. ते सांगतात की, आमच्या येथून फक्त २५० रुपयात महागडे लेहंगे भाड्याने मिळतात. सर्वात खास गोष्ट अशी आहे की, भाड्याने दिलेले लग्नासाठी कपडे येथे एका फॅशन डिझायनरने बनवले आहेत. या प्रयत्नांमुळे, आमच्या संस्थेस आयएसओद्वारे देखील प्रमाणित केले गेले आहे ज्याचा आम्हाला फार अभिमान आहे.”
केतन हे काम गेली तीन वर्षे करत आहेत. ते म्हणतात की, त्यांनी फक्त एक रुपयांच्या किंमतीवर आजवर चार हजार मुलींचे केस सेट केले आहेत. यासह त्यांनी एक हजाराहून अधिक मुलींचे मेकअपही केले आहेत. केसांचा सेट आणि मेकअपबरोबरच केतन मुलींना ब्युटीशियनचे प्रशिक्षणही अगदी कमी शुल्कात देतात. त्यांनी आतापर्यंत ३५०-४०० मुलींना ब्युटिशियन म्हणून प्रशिक्षण दिले आहे. त्यांनी पाच मुलींना रोजगारही दिला आहे. त्यांच्या पार्लरमधून ब्यूटीशियनचा कोर्स केल्यावर त्या तिथे काम करतात आहेत.
केतन हिरपरा या कामामुळे खुश आहे. ते म्हणतात की, त्यां”च्या पार्लरमध्ये नेहमीच मुली आणि महिलांची गर्दी असते. त्या आमच्या कामाचे कौतुकही करतात. यामुळे आम्हाला केवळ सुरतच नाही तर संपूर्ण गुजरातमध्ये मान्यता मिळाली आहे. आता देशातील लोकही आम्हाला ओळखू लागले आहेत.”
पाहा व्हिडीओ: