Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नव्या ‘सीडीएस’ नेमणुकीची प्रक्रिया सुरु, लष्करप्रमुख जनरल नरवणेंचं नाव आघाडीवर!

December 10, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
M.M Narvane

मुक्तपीठ टीम

बुधवारी तामिळनाडू हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जाण्याने देशाचे नुकसान झाले असून सीडीएस हे पद ही रिक्त झाले आहे. सरकार लवकरच नव्या सीडीएस जनरल यांच्या नियुक्तीची घोषणा करणार असल्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नव्या सीडीएस पदासाठी सर्वाधिक पात्र समजल्या जाणाऱ्यांमध्ये लष्करप्रमुख जनरल एम.एम.नरवणे यांचे नाव आघाडीवर आहे.

 

लष्करप्रमुख जनरल एम.एम.नरवणे यांच्या बाजूने अनेक सेवानिवृत्त लष्करी कमांडर म्हणाले की, जनरल नरवणे यांना या पदावर नियुक्त करणे एक विवेकपूर्ण पाऊल असेल कारण ते ५ महिन्यांत लष्करप्रमुख पदावरून निवृत्त होणार आहेत.

 

नव्या सीडीएसच्या नियुक्तीसाठी सरकार लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या वरिष्ठ कमांडर्सची एक समिती स्थापन करणार आहे. तिन्ही सेवादलांची ही समिती येत्या दोन-तीन दिवसांत निर्णय घेऊन पुढील नियुक्ती करेल.

 

तिन्ही दलांच्या समितीने शिफारस केलेली नावं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे अंतिम करण्यासाठी पाठवली जाणार आहेत. संरक्षण मंत्र्यांकडून मंजुरी मिळाल्यानंतर, नावं मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीकडे विचारासाठी पाठवली जातील, जी भारताच्या पुढील सीडीएसच्या नावावर अंतिम निर्णय घेईल. या प्रकरणातील तज्ज्ञांनी ही माहिती दिली आहे.

 

सीडीएसची नियुक्ती प्रक्रिया

  • सध्या देशात सीडीएसच्या नियुक्तीसाठी कोणताही नियम किंवा प्रक्रिया नाही.
  • सीमा सुरक्षा आव्हाने लक्षात घेऊन सरकार नवीन सीडीएस पद नियुक्त करणार आहे.
  • सध्या सीडीएसच्या नियुक्तीचे मुलभूत निकष अगदी सोपे आहेत.
  • लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही सेवांचा कमांडिंग ऑफिसर सीडीएस पदासाठी पात्र आहे.
  • लष्करी अधिकाऱ्याच्या गुणवत्तेसह ज्येष्ठतेच्या आधारे सरकारने निर्णय घ्यावा.
  • सीडीएस म्हणून नियुक्त होणाऱ्या अधिकाऱ्याचे वय ६५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

 

भारतीय लष्करप्रमुख जनरल एम.एम.नरवणे हे जनरल बिपीन रावत यांच्यानंतर लष्करातील सर्वात वरिष्ठ अधिकारी आहेत.
जनरल नरवणे यांचा कार्यकाळ एप्रिल २०२२ मध्ये संपत आहे, त्यामुळे ते सीडीएस पदासाठी सर्वात योग्य मानले जात आहेत.

जनरल नरवणे यांनी डिसेंबर २०१९ मध्ये जनरल बिपीन रावत यांच्याकडून भारतीय लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. तसेच सशस्त्र दलांच्या इतर दोन प्रमुखांच्या तुलनेत त्यांना ज्येष्ठतेच्या यादीत शीर्षस्थानी ठेवले आहे. जनरल नरवणे यांची कामगिरी आणि त्यांनी पूर्व लडाखमधील अडथळे ज्या पद्धतीने हाताळले ते लक्षात घेता त्यांची सर्वोच्च पदावर नियुक्ती होण्याची शक्यता जास्त आहे. एअर चीफ मार्शल व्ही.आर.चौधरी आणि अॅडमिरल आर. हरी कुमार यांच्या नावांचाही विचार होण्याची शक्यता आहे. जनरल बिपीन रावत यांना भारतीय लष्कराचे प्रमुख बनवण्यात आले तेव्हा त्यांच्यापेक्षा दोन अधिकारी वरिष्ठ होते.


Tags: CDS Bipin RawatM.M. Naravnetamilnaduएम.एम.नरवणेतामिळनाडूसीडीएस जनरल बिपीन रावत
Previous Post

‘आठवणींतले प्रबोधनकार’ पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाईंच्या हस्ते

Next Post

महापौर-शेलार वादाला वेगळं वळण, गलिच्छ भाषेतील धमकीचं पत्र!

Next Post
kishori pednekar

महापौर-शेलार वादाला वेगळं वळण, गलिच्छ भाषेतील धमकीचं पत्र!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!