Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘आठवणींतले प्रबोधनकार’ पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाईंच्या हस्ते

December 10, 2021
in घडलं-बिघडलं
0
'आठवणींतले प्रबोधनकार' या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा 1

मुक्तपीठ टीम

थोर समाजसुधारक केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘आठवणींतले प्रबोधनकार’ या विजय वैद्य लिखित पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. प्रबोधनकार ठाकरे यांच्या जीवनातील प्रेरणादायी कार्यावर आधारित लघुपट तयार करण्यात येणार असल्याची माहितीही मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी दिली.

'आठवणींतले प्रबोधनकार' या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा 2

प्रबोधनकार ठाकरे यांनी सुरू केलेल्या ‘प्रबोधन’ या नियतकालिकाचे यंदा शताब्दी वर्ष सुरु आहे. या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून त्यांच्या जीवनावर आधारित ‘आठवणींतले प्रबोधनकार’ या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा येथील मुंबई मराठी पत्रकार भवनात आयोजित करण्यात आला होता. यावेळी सुभाष देसाई बोलत होते.

प्रबोधनकार ठाकरे यांच्या जीवनावर आधारित पुस्तक लिहणे आणि ते वाचणे हे धाडसाचे काम असल्याचे सांगून मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई म्हणाले, प्रबोधनकार ठाकरे यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत ‘प्रबोधन’ नियतकालिकाची सुरूवात केली, त्यासाठी अनेकांनी कष्ट घेतले असून त्यांचे योगदान न विसरण्यासारखे आहे. प्रबोधनकारांच्या जीवनकार्यावर आधारित पुस्तकाची निर्मिती होतेय ही आनंदाची बाब आहे. ‘आठवणीतले प्रबोधनकार’ या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांच्या कार्याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन श्री.देसाई यांनी यावेळी केले. प्रबोधनकार ठाकरे यांच्या ‘प्रबोधन’ या नियतकालिकाच्या अंकात प्रकाशित झालेल्या जवळजवळ १ हजार ५०० लेखांचा संग्रह तयार करून त्याचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले आहे. प्रबोधनकार ठाकरे यांच्या जीवनातील प्रेरणादायी कार्यावर आधारित लघुपट तयार करण्यात येणार असल्याची माहितीही श्री. देसाई यांनी यावेळी दिली.

पुस्तकाचे प्रकाशक भास्कर जाधव म्हणाले, हे पुस्तक तरूण पिढीसाठी प्रेरणादायी आणि विचारांच्या पलीकडे जावून कार्य करण्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. प्रबोधनकार ठाकरे यांनी सुरू केलेल्या चळवळीला पुढे नेण्यासाठी तरूणांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल, असे भास्कर जाधव यांनी प्रास्ताविकात सांगितले.

ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य, ‘मार्मिक’ चे माजी कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, मंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पत्रकार महेश म्हात्रे यांनी केले.


Tags: Athavanintale Prabodhankarsubhash desaiआठवणींतले प्रबोधनकारसुभाष देसाई
Previous Post

दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान राज्यभरात व्यापक स्वरुपात राबविणार

Next Post

नव्या ‘सीडीएस’ नेमणुकीची प्रक्रिया सुरु, लष्करप्रमुख जनरल नरवणेंचं नाव आघाडीवर!

Next Post
M.M Narvane

नव्या 'सीडीएस' नेमणुकीची प्रक्रिया सुरु, लष्करप्रमुख जनरल नरवणेंचं नाव आघाडीवर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!