मुक्तपीठ टीम
बंगळुरूमधील निओबँक प्लॅटफॉर्म ‘ओपन’ भारताचा १०० वा युनिकॉर्न ठरला आहे. नवा निधी उभारल्यानंतर कंपनीचे मूल्यांकन १ अब्ज डॉलर्सच्यापुढे गेले आहे. १ अब्ज डॉलर्सचे मुल्यांकन असलेले स्टार्टअप युनिकॉर्न मानले जाते.
‘ओपन’मध्ये कुणी केली नवी गुंतवणूक?
ओपनचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनिश अच्युतान यांनी कंपनीतील गुंतवणुकीची माहिती दिली. ते म्हणाले, आयआयएफएलच्या नेतृत्वाखालील विद्यमान गुंतवणूकदार टायगर ग्लोबल, टेमसेक आणि थ्रीवनफोर कॅपिटल यांनीही अलीकडेच कंपनीत गुंतवणूक केली आहे. निओबँक प्लॅटफॉर्मचा वापर देशातील २० लाखांहून अधिक व्यवसाय करत आहेत आणि ते दरवर्षी ३० अब्ज डॉलर्सचे व्यवहार करत आहेत.
आरबीआय परवाना देत नसल्याने पारंपरिक बँकाच्या साथीने सेवा
- निओ बँकेचे कामकाज १००% डिजिटल आहे. त्याची कोणतीही शाखा नाही. सर्व काही अॅपद्वारे केले जाते.
- निओबँक पारंपारिक बँकेत उपलब्ध असलेल्या सर्व बँकिंग सुविधा देते.
- भारतात जवळपास डझनभर निओबँका आहेत. यामध्ये रेझरपेक्स, ओपन, निओ यांचा समावेश आहे.
- भारतीय रिझर्व्ह बँकेने अद्याप निओ बँकेला भारतात परवाना दिलेला नाही.
- यामुळे, या बँका पारंपरिक बँकांच्या सहकार्याने बँकिंग सेवा देतात. या बाबतीत आयसीआयसीआय बँक आघाडीवर आहे.
पाहा व्हिडीओ: