Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

चौथ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांमध्ये साडेआठ हजार क्रीडापटू सहभागी होणार! आतापर्यंतची सर्वात जास्त संख्या!!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
khelo India Youth Sports Competition

मुक्तपीठ टीम

चौथ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांमध्ये आतापर्यंतचे सर्वात मोठे, देशातील साडेआठ हजार क्रीडापटूंचे पथक सहभागी होणार आहे. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी या स्पर्धांसाठीचे आज पंचकुला येथील इंद्रधनुष प्रेक्षागृहात खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा २०२१ साठीचे बोधचिन्ह, प्रेरकगीत, जर्सी आणि शुभंकर यांचे अनावरण केले त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, देशाच्या एकूण लोकसंख्येच्या केवळ २% लोकसंख्या असलेल्या हरियाणा राज्यातील खेळाडूंनी अनेक क्रीडास्पर्धांमध्ये देशाला मोठ्या प्रमाणावर पदके मिळवून दिली आहेत. केंद्रीय जल शक्ती राज्यमंत्री रत्तन लाल कटारिया यांच्यासह हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल, उपमुख्यमंत्री दुष्यंत चौताला, हरियाणा विधानसभा अध्यक्ष ज्ञानचंद गुप्ता, हरियाणाचे क्रीडामंत्री संदीप सिंग, हरियाणाचे मुख्य सचिव संजीव कौशल आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

पारंपरिक खेळांच्या संरक्षणावर भर देत केंद्रीय मंत्री ठाकूर म्हणाले की गटका, कलरीपयटू, थंग-ता, मल्लखांब आणि योगासने हे पारंपरिक क्रीडाप्रकार आगामी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा २०२१ मध्ये समाविष्ट असतील. ते म्हणाले की, युवा क्रीडास्पर्धा आणि नुकत्याच संपलेल्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा यांच्यामुळे युवकांना भविष्यात अधिक मोठी उद्दिष्ट्ये साध्य करण्याची प्रेरणा मिळेल. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री म्हणाले की, क्रीडापटूंनी उत्तम कामगिरी करून दाखवावी यासाठी भारत सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे.

आपले राज्य या क्रीडास्पर्धांसाठी संपूर्णपणे सज्ज आहे असे सांगून हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी आपल्या राज्याला खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा २०२१ चे यजमानपद भूषविण्याची संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. हे राज्य केवळ देशासाठी अन्नधान्याचेच उत्पादन करत नाही तर राज्यातील खेळाडू देशासाठी पदके देखील जिंकून आणतात असे ते म्हणाले. आपल्या शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीसाठी खेळ उत्तम ठरतात असे ते पुढे म्हणाले.

हरियाणाचा ‘धाकड’ हा शुभंकर!

‘जया नावाचे काळवीट आणि विजय नामक वाघ’ हे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेसाठीचे शुभंकर आहेत तर खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा २०२१ साठी हरियाणाचा ‘धाकड’ हा शुभंकर असणार आहे. चौथ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा ४ जून ते १३ जून या कालावधीत हरियाणामध्ये होणार आहेत.

पाहा व्हिडीओ:

 


Tags: AthletesGatkagood newsKalaripayatukhelo India Youth Sports CompetitionMallakhambamuktpeethThang-taUnion Minister for Youth Affairs and Sports Anurag ThakurYogasanaकलरीपयटूकेंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूरक्रीडापटूखेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धागटकाचांगली बातमीथंग-तामल्लखांबमुक्तपीठयोगासन
Previous Post

कोल्हापूरात १२५ वाद्यांचा दुर्मिळ खजिना, ‘महाताल उत्सव लोक वाद्यांचा’!

Next Post

भारताचा १००वा युनिकॉर्न! निओबँक प्लॅटफॉर्म ‘ओपन’चं बाजार मूल्य १ अब्ज डॉलर!

Next Post
100th Unicorn

भारताचा १००वा युनिकॉर्न! निओबँक प्लॅटफॉर्म 'ओपन'चं बाजार मूल्य १ अब्ज डॉलर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!