मुक्तपीठ टीम
सध्या कोरोना संकट काळात सर्वाधिक व्यवहार ऑनलाईन पद्धतीने होतं आहेत. जर तुम्ही ही ऑनलाईन पद्धतीनेचं व्यवहार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं ट्विट करत ऑनलाईन पैसे पाठवण्यासाठी वापरली जाणारी एनईएफटी सेवा २३ मे रोजी १४ तासांसाठी बंद ठेवण्यात येईल, अशी माहिती दिली आहे.
रिझर्व्ह बँकेच्या ट्विटमध्ये काय?
- आरबीआयने आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट करत सांगितले की, २२ मे रोजी बँकांचे कामकाज संपल्यानंतर टेक्निकल अपग्रेडेशन केले जाईल.
- यामुळे एनईएफटीची सेवा २३ मे रोजी रात्री १२ वाजल्यापासून दुपारी २ वाजेपर्यंत सेवा बंद असणार आहे.
- याचाच अर्थ या कालावधीत पैसे ट्रान्सफर करताना अडथळे निर्माण होतील.
- पण यादरम्यान, आरटीजीएस सेवा सुरु असणार आहे.
NEFT System Upgrade – Downtime from 00.01 Hrs to 14.00 Hrs. on Sunday, May 23, 2021https://t.co/i3ioh6r7AY
— ReserveBankOfIndia (@RBI) May 17, 2021
एनईएफटी सेवेबद्दल
- एनईएफटी म्हणजे नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रांसफर सिस्टम
- एनईएफटी सेवेच्या माध्यमातून देशांतर्गत ऑनलाइन पद्धतीने पैसे ट्रान्सफर करता येतात.
- रिझर्व्ह बँकेने २००५ पासून भारतीय ग्राहकांना ही सेवा उपलब्ध करुन दिली आहे.
- सुरुवातीला ग्राहकांसाठी ही सेवा सकाळी आठ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत उपलब्ध होती.
- पण १६ डिसेंबर २०१९ पासून एनईएफटी सेवा २४ तास सुरु करण्यात आली आहे.
- यापूर्वी बँकेच्या सुट्टीच्या दिवशी एनईएफटीचे व्यवहार होत नव्हते.
- तसेच त्या व्यवहारांवर १ ते २५ रुपयांपर्यंत शुल्क आकारले जात होते.
- वर्ष २०२० मध्ये रिझर्व्ह बँकेच्या नव्या निर्णयानुसार ही सेवा पूर्णपणे मोफत करण्यात आली आहे.