Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“मराठा आरक्षणाला पुन्हा एकदा अनाजीपंती ‘कात्रज’ दाखवण्याचा भाजपाचा कावेबाज डाव!”

काँग्रेसचे विषेश प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील यांची टीका

May 17, 2021
in घडलं-बिघडलं
0
Dr sanjay lakhepatil

मुक्तपीठ टीम

केंद्र सरकारच्या माध्यमातून घटनात्मक, कायदेशीरित्या संसदेच्या दोन्ही सभागृहात मराठा आरक्षणाला संरक्षण देण्यासाठी नकारघंटा वाजवणारे आणि दिल्लीश्वराकडे कोणी बोटच दाखवू नये यासाठी डोळ्यात तेल घालून चौकीदारी करणाऱ्या राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन करण्याचा, मोर्चे काढण्याचा घेतलेला निर्णय हा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या ठेवणीतील डाव असून मराठा आरक्षणाला पुन्हा एकदा अनाजीपंती ‘कात्रज’ दाखवण्याचा कावेबाज डाव असल्याची प्रखर टीका, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे विषेश प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील यांनी केली आहे.

 

मराठा आरक्षणप्रश्नी भाजपाचा खरपूस समाचार घेताना लाखे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षण प्रश्नी भाजपा मगरीचे अश्रू ढाळत असून एसईबीसी-१८ शासन आदेश प्रक्रियेतील चुका, घटनात्मक अडथळे दुर करत मराठा आरक्षणाला न्याय मिळवून देण्याऐवजी गावोगाव आंदोलन करून महाराष्ट्र विकास आघाडी सरकारविरोधात बोंबाबोंब करत स्वतःच्या घोडचूका झाकून ठेवण्याचा हा प्रकार आहे. भाजपा नेते विनायक मेटे आणि नरेंद्र पाटील मराठ्यांना राज्य सरकार विरोधात भडकावयाच्या आंदोलनाचे नियोजन करणार आणि मराठवाड्यातील बीडपासून राज्यभरातील मोर्चे, अंदोलनाला रसद पुरवणे हा भाजपाचा अजेंडा ठरलेला आहे. परंतु मराठा समाजाला खरेच आरक्षण मिळावे अशी भारतीय जनता पक्षाची भूमिका असेल तर संसदेचे खास अधिवेशन बोलवावे आणि राज्याचे अधिकार काढून घेणारी १०२ वी वांझोटी घटनादुरुस्ती तातडीने रद्द करावी, कालबाह्य झालेल्या इंद्रा सहानी खटल्यातील ५०% आरक्षण मर्यादेची अट काढून टाकायचे विधेयक संसदेत मंजूर करावे. मराठा एसईबीसी_१८ आरक्षणाला संसदेच्या दोन्ही सभागृहाचे २/३ बहुमताने संरक्षण द्या आणि ते ०९ व्या शेड्युल्डमधे टाका मग मराठा आरक्षण कोणतेही न्यायालय थांबवू शकत नाही.

 

वरील तिन्ही मुद्दे केंद्र सरकार आणि संसदेच्या अधिकारात आहेत राज्य सरकारच्या नाहीत म्हणून राजकारण न करता खरेच मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायची भारतीय जनता पक्षाची भूमिका असेल तर ‘बोंबाबोंब’ मोर्चे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या घरासमोर काढा. राज्यात मोर्चे काढण्याची आपली अनाजीपंती नौटंकी मराठा समाज आणि राज्यातील जनता पुरती ओळखून आहे तसेच बीडपासून सुरू होणाऱ्या भाजपाई विनायक मेटे प्रायोजित मोर्चाचा खरा उद्देश सुध्दा माहित आहे, असा टोलाही डॉ. संजय लाखे पाटील यांनी लगावला आहे.

 

 


Tags: BJPCongressअमित शहाजे. पी. नड्डाडॉ. संजय लाखे पाटीलपंतप्रधान नरेंद्र मोदीभाजपामराठा आरक्षणविनायक मेटे
Previous Post

बँक अलर्ट: एनईएफटी सेवा ‘या’ दिवशी राहणार १४ तास बंद!

Next Post

… आणि लढाऊ बाण्याचे एन.डी. पाटील कोरोनालाही हरवून घरी परतले

Next Post
saroj patil

... आणि लढाऊ बाण्याचे एन.डी. पाटील कोरोनालाही हरवून घरी परतले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!