Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

समजून घ्या एपिलेप्सी म्हणजे अपस्मार…

September 6, 2026
in आरोग्य
0
dieses

मुक्तपीठ टीम

एपिलेप्सी हा मेंदूसंबंधीत आजार आहे. फिट येणं, आकडी, मिरगी अशा शब्दांनीही एपिलेप्सीला बोली भाषेत संबोधले जाते. या आजाराला मराठीमध्ये अपस्मार असे म्हणतात. मेंदूतील रासायनिक व विद्युत कंपन लहरींचे संतुलन बिघडल्याने असे होते. या आजाराविषयी नीट माहिती घेणं, गैरसमज दूर करणं यातून उपचारांविषयीची जागरुकता वाढेल आणि त्याचा उपयोग रुग्णांना होईल.

अपस्मार म्हणजे एपिलेप्सीची लक्षणे-

  • पेशंट अचानकपणे तोल जाऊन खाली बेशुद्ध होऊन पडतो.
  • स्नायू एकदम घट्ट आणि कडक होतात, झटका येतो.
  • शरीराच्या विचित्र हालचाली होतात.
  • दातखिळी बसते.
  • तोंडातून फेस येऊ लागतो.
  • डोळे फिरविणे
  • साधारणात: एक ते तीन मिनिटापर्यंत रुग्ण बेशुद्ध असू शकतो. त्यानंतर ती व्यक्ती शुद्धीवर येते.

 

एपिलेप्सी कारणे-

  • मानसिक ताण-तणाव
  • अपूर्ण झोप
  • रक्तदाब वाढल्यास
  • रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्यास
  • स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या वेळच्या काही समस्यांमुळे
  • Anti-psychotic किंवा Anti- depressant औषधांच्या दुष्परिणामामुळे
  • डोक्याला मार लागल्यामुळे

 

एपिलेप्सीचे निदान-

  • मेंदूरोग तज्ज्ञाकडून सल्ला घेणे.
  • पेशंटची हिस्ट्री, शारीरिक तपासणी आणि E.E.G (Electroencephelography), MRI स्कॅन, CT स्कॅन इ. चाचण्या करून याचे निदान केले जाते.
  • एपिलेप्सी आजार उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून एपिलेप्सीचे निदान झाल्यानंतर आधी Anti-epileptic औषधे सुरू केली जातात.
  • औषधांनी जर एपिलेप्सी नियंत्रणात येत नसल्यास मेंदूवरील सोपी आणि सुटसुटीत शस्त्रक्रियने (Operation) एपिलेप्सीवर यशस्वी उपचार होऊ शकतात.

 

झटका आल्यास काय करावे?

  • स्वतः शांत राहा व भयभीत होऊ नका.
  • बेशुद्ध येऊन पडलेल्या रुग्णास जबरदस्तीने हलवू नका.
  • रुग्णाला डाव्या किंवा उजव्या कुशीवर झोपवावे,
  • जेणेकरून रुग्णाच्या तोंडात अडकलेली लाळ किंवा फेस बाहेर पडून जाईल.
  • नंतर रुग्णाला पाठीवर झोपवावे व त्याच्या डोक्याखाली उशी ठेवावी.
  • काहीही प्यायला देऊ नका
  • इजा पोहोचतील अशा वस्तू आजूबाजूला ठेवू नका
  • साधारण दोन ते तीन मिनिटे रुग्ण बेशुद्ध राहतो.
  • थोड्या वेळात रुग्ण आपोआप शुद्धीवर येतो.

 

एपिलेप्सी रुग्णासाठी महत्त्वाच्या सूचना –

  • डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घ्यावीत.
  • नियमित डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी .
  • पुरेशी झोप घ्यावी.
  • योगा, प्राणायाम, ध्यानधारणा करावी. नियमित व्यायाम करावा.
  • चहा , कॉफी , सिगारेट , बीडी , तंबाखू आणि अल्कोहोल यांचे सेवन करणे टाळा .
  • रुग्णाने आपल्या खिशामध्ये आपले नाव , पत्ता , घरातील फोननंबर आणि Epilepsy रुग्ण असल्यासंबंधी माहिती लिहिलेली चिट्टी ठेवावी .
  • या चिठ्ठीमध्ये फेफरे आल्यास आजूबाजूच्या लोकांनी काय करावे याविषयीची माहिती लिहिलेली असावी .

Tags: diseaseepilepsyhealthअपस्मारआरोग्यएपिलेप्सी
Previous Post

श्रीकांत शिंदेंचा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पदाधिकाऱ्यांशी झूम संवाद

Next Post

बँक अलर्ट: एनईएफटी सेवा ‘या’ दिवशी राहणार १४ तास बंद!

Next Post
RBI

बँक अलर्ट: एनईएफटी सेवा 'या' दिवशी राहणार १४ तास बंद!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!