मुक्तपीठ टीम
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने NEET UG २०२२ साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख पुन्हा एकदा वाढवली आहे. एजन्सीने जारी केलेल्या सूचनेनुसार, NEET (UG) २०२२ परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २० मे २०२२ पर्यंत वाढवण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार २० मे रोजी रात्री ९ वाजेपर्यंत NEET (UG) २०२२ ची नोंदणी करू शकतात. परंतु , उमेदवारांनी त्याच दिवशी रात्री ११:५० पर्यंत परीक्षेचे शुल्क भरावे.
- अर्ज प्रक्रिया ६ एप्रिल रोजी सुरू झाली असून ६ मे नोंदणीची अंतिम तारीख होती, ती आता २० मेपर्यंत वाढवण्यात आली आहे.
- ही प्रवेश परीक्षा वैद्यकीय शिक्षण संस्थांमधील वैद्यकीय आणि दंतविज्ञानाच्या पदवीपूर्व स्तरावरील अभ्यासक्रमांमध्ये २०२२-२३ मध्ये प्रवेशासाठी घेतली जाणार आहे.
अर्ज कसा करावा
- सर्वप्रथम NEET UG 2022 साठी अर्ज करण्याऱ्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट, neet.nta.nic.in ला भेट द्यावी.
- ‘NEET (UG) 2022 साठी नोंदणी’ या लिंकवर क्लिक करा.
- नवीन नोंदणीच्या लिंकवर क्लिक करा.
- विचारलेले तपशील भरून नोंदणी पूर्ण करा.
- अर्ज क्रमांक आणि पासवर्ड वापरून NTA द्वारे लॉग इन करा.
- अर्ज करताना उमेदवारांना १६०० रुपये शुल्क भरावे लागेल.
- आरक्षित श्रेणींसाठी शुल्क भरण्यास सूट आहे.