मुक्तपीठ टीम
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) बँकांशी संबंधित डिजिटल फसवणुकीबद्दल लोकाच्या जागरुकतेसाठी जनजागृती मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राही सहभागी झाला आहे. या मोहिमेअंतर्गत नीरज ग्राहकांना बँकिंग फसवणूक कशी टाळावी याबद्दल माहिती देत आहे.
खरतर, आरबीआयने नीरज चोप्राचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या ट्विटमध्ये आरबीआयने लिहिले आहे – थोडीशी सावधगिरी एक मोठी समस्या दूर करू शकते. त्याचवेळी, नीरज चोप्रा व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहे – आरबीआयने सांगितले की,तुमचा ओटीपी, सीव्हीव्ही, एटीएम पिन कोणासोबतही शेअर करू नका. वेळोवेळी तुमचा ऑनलाईन बँकिंग पासवर्ड आणि पिन बदला. जर तुम्ही तुमचे एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड, प्रीपेड कार्ड हरवले तर ते लगेच ब्लॉक करा.
स्टेट बँक ऑफ इंडियासह अनेक बँका आपल्या ग्राहकांना वेळोवेळी ऑनलाईन बँकिंग फसवणुकीविरोधात चेतावणी देत आहेत. यासोबतच बँकांकडून ग्राहकांना सुरक्षित ऑनलाइन बँकिंगच्या पद्धतीची माहितीही दिली जाते.