Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लसीकरणात पुरुषांएवढेच मिळणार महिलांनाही स्थान!

महिला आयोगाच्या पत्रानंतर सरकारी यंत्रणा जागण्याची शक्यता!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
NCW

मुक्तपीठ टीम

महिलांमध्ये कोरोना विरोधी लसीकरणाच्या आकडेवारीचा अभाव असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये येत आहेत. या बातम्यांची गंभीर दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की लसीकरणातील लिंगभेद कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जाव्या. लसीकरणाच्या सरकारी आकडेवारीनुसार आतापर्यंत २७ कोटी ८६ लाख ४० हजार ०४३ पुरुष तर स्त्रीयांमध्ये २४ कोटी ७५ लाख ०३ हजार ६२५ महिलांना लस मिळाली आहे.

 

देशभरात जाहीर करण्यात आलेल्या कोरोना लसीकरणाअंतर्गत महिला आणि पुरुषांना दिल्या गेलेल्या डोसमधील फरकाचा उल्लेख करून महिला आयोगाने आपल्या पत्रात लिहिले आहे की लसीकरण मोहिमेत महिला मागे राहणार नाहीत याची खात्री बाळगण्यात यावी.

 

@NCWIndia has written to Chief Secretaries of all States/UTs on gender gap in vaccination coverage. Chairperson @sharmarekha has asked for measures to close the gender gap in vaccination & to ensure women are not left behind in the vaccination drive.@PIBWCD @PIB_India @PBNS_India pic.twitter.com/LU9zGTQY0y

— NCW (@NCWIndia) August 13, 2021

 

लसीकरणामधील फरक चिंताजनक!

  • ‘लसीकरणात पुरुष आणि स्त्रियांमधील फरक हा चिंतेचा विषय आहे,’ असे महिला आयोगाने स्पष्ट केले.
  • यासाठी राष्ट्रीय अध्यक्षा रेखा शर्मा यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून त्यांना हे अंतर संपवण्यास सांगितले आहे, जेणेकरून महिला लसीकरणापासून वंचित राहणार नाहीत.
  • आयोगाने पत्रात असेही लिहिले आहे की, अशी अनेक कुटुंबे आहेत जिथे स्त्रियां घराबाहेर पडत नाहीत, म्हणुन त्यांच्या आरोग्यास पुरुषांच्या आरोग्यापेक्षा कमी प्राधान्य दिले जाते.
  • परंतु घरातल्या प्रत्येकाची काळजी घेणाऱ्या महिलांना संसर्ग होण्याची अधिक शक्यता असते आणि म्हणूनच त्यांना लसीचा डोस देणे महत्वाचे आहे.

 

लसीकरणातील भेदभाव

  • सरकारी आकडेवारीनुसार, २७ कोटी ८६ लाख ४० हजार ०४३ पुरुष, २४ कोटी ७५ लाख ०३ हजार ६२५ महिला यांना लस देण्यात आली आहे.
  • केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केल्या नुसार आतापर्यंत देशव्यापी कोरोना लसीकरणाखाली कोरोना संसर्ग टाळण्यासाठी ५२,९५,८२,९५६ डोस देण्यात आले आहेत, त्यापैकी ५७,३१,५७४ डोस गेल्या २४ तासांमध्ये देण्यात आले आहेत.
  • केंद्राने आतापर्यंत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीचे ५५.०१ कोटीहून अधिक डोस प्रदान केले आहेत.
  • राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि खाजगी रुग्णालयांमध्ये सध्या २.८२ कोटींपेक्षा जास्त लस डोस उपलब्ध आहेत.

Tags: coronaDr. bharti pawargender equalityNCWRekha sharmaकेंद्रीय आरोग्य मंत्रालयकोरोनामहिला आयोगराष्ट्रीय अध्यक्षा रेखा शर्मा
Previous Post

२ सेकंदात १०० किमीचा स्पीड…भारताची पहिली ई-सुपर कार लवकरच!

Next Post

लॉकडाऊन नियम शिथिल झाल्याने विमानप्रवासास सुरुवात!

Next Post
Air

लॉकडाऊन नियम शिथिल झाल्याने विमानप्रवासास सुरुवात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!