Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोना काळात अनाथ झालेल्या मुलांसाठी ‘राष्ट्रवादी जीवलग’ योजना

"अजित पवारांच्या वाढदिवसापासून राज्यात सुरुवात": खासदार सुप्रिया सुळे

July 21, 2021
in घडलं-बिघडलं
0
NCP

मुक्तपीठ टीम

कोरोना काळात राज्यात अनाथ झालेल्या ४५० मुलांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उद्यापासून ‘राष्ट्रवादी जीवलग’ ही योजना सुरू करण्यात येत असल्याची घोषणा राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज दिल्ली येथून फेसबुक लाईव्हवरुन केली.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट यांच्या माध्यमातून राज्यात अनाथ झालेल्या ४५० मुलांसाठी प्रेमाचा आधार म्हणून ‘राष्ट्रवादी जीवलग’ ही योजना सुरू करण्यात येत आहे. याचा पहिला टप्पा हा एक वर्षाचा असून यासाठी पक्षातील एक सहकारी असे ४५० जण या ४५० कुटुंबांशी म्हणजे त्या मुलांशी जोडले जाणार आहेत. यासाठी राष्ट्रवादीने ‘राष्ट्रवादी दूत’ निर्माण केला असून यामध्ये मुलींसाठी पक्षातील महिला, युवती तर मुलांसाठी युवक किंवा पुरुष कार्यकर्ता जोडला जाणार आहे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

‘राष्ट्रवादी दूत’ या ४५० अनाथ मुलांच्या घरात जाईल. त्यांना काय गरज आहे, त्यांची अडचण समजून घेऊन ती माहिती पक्षाकडे देणार आहे. शिवाय या अनाथ मुलांची माहिती प्रत्येक जिल्हाधिकारी यांच्याकडे उपलब्ध आहे तो डाटाही जमा केला जाईल आणि यातून एक व्यापक कार्यक्रम व पारदर्शक कारभार केला जाणार आहे. शिवाय यांची इत्यंभूत माहिती पक्षाच्या वेबसाईटवर व स्वतः माझ्या पेजवर उपलब्ध राहिल, असेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

या अनाथ मुलांच्या आयुष्यात जी पोकळी निर्माण झाली आहे ती पोकळी भरून काढण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या ‘राष्ट्रवादी जीवलग’ या योजनेतून केले जाणार आहे असेही सुप्रिया सुळे यांनी जाहीर केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उद्यापासून या योजनेला सुरुवात होणार असून आज दिल्लीतून खासदार सुप्रिया सुळे यांनी या योजनेची घोषणा करताना या योजनेची संकल्पना अंमलात आणणार्‍या राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतानाच अजित पवारांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छाही दिल्या.


Tags: birthdayDeputy Chief Minister Ajit PawarNCPsupriya suleउपमुख्यमंत्री अजित पवारखासदार सुप्रिया सुळेफेसबुकराष्ट्रवादी जीवलग योजनाराष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट
Previous Post

राज कुंद्राचे ‘पॉर्न’ताप, शिल्पा शेट्टीला ताप!

Next Post

क्रांतिवीर वीर सिंदूर लक्ष्मण यांच्या कुटुंबास स्वातंत्र्यसैनिकांचा दर्जा देण्याची मागणी

Next Post
Veer Sindur Laxman

क्रांतिवीर वीर सिंदूर लक्ष्मण यांच्या कुटुंबास स्वातंत्र्यसैनिकांचा दर्जा देण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!