मुक्तपीठ टीम
सोमवारी पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्र काँग्रेसवर गंभीर आरोप केले. देशात कोरोना पसरवण्यात महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार असल्याचे मोदी म्हणाले. मुंबईत काँग्रेसने मजुरांना तिकीट काढून देत आपआपल्या राज्यांत जाण्यासाठी उकसवले, असा आरोप मोदींनी केला. काँग्रेसवर आरोप करत केलेल्या भाषणात त्यांनी महाराष्ट्रावरचं ओझं कमी करण्यासाठी उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाबसारख्या राज्यात कोरोना पसरवल्याचा आरोप केल्याने महाराष्ट्रात संताप पसरला. महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी मोदींच्या या वक्तव्याचा निषेध केला. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने देखील भाजपावर ‘ट्वीट हल्ला’ केला आहे.
राष्ट्रवादीचा भाजपावर ‘ट्वीट हल्ला’
श्रमिक ट्रेन सोडल्या म्हणून आधी त्याचे श्रेय घेतले. आता त्याच श्रमिक ट्रेनमधून गेलेल्या मजुरांद्वारे कोरोना पसरला असे दावे केले. चुनावजीवींचा पॅटर्नच वेगळा…#महाराष्ट्रद्वेषी_bjp #Shameful #UP #panjab #Uttarakhand #Election2022 pic.twitter.com/f6b6zTSyP2
— NCP (@NCPspeaks) February 8, 2022
- राष्ट्रवादी काँग्रेसने ट्वीटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कार्टून आणि रेल्वे दाखवली आहे.
- त्यावर “झुकझुक झुकझुक श्रमिक गाडी, प्रचाराच्या रेषा संसदेत काढी, थापांची पुडी सोडूया, सत्तेच्या गावाला जाऊया” असं लिहिलं आहे.
- पुढे राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “श्रमिक ट्रेन सोडल्या म्हणून आधी त्याचे श्रेय घेतले. आता त्याच श्रमिक ट्रेनमधून गेलेल्या मजुरांद्वारे कोरोना पसरला असे दावे केले. चुनावजीवींचा पॅटर्नच वेगळा.”
या ट्वीटमध्ये राष्ट्रवादीने भाजपाला लक्ष्य करत महाराष्ट्रद्वेषी हा हॅशटॅग वापरला आहे. तसेच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी अशी टीका करत असल्याचं सुचवत तसे हॅशटॅगही वापरले आहेत.
मोदींनी नेमके कोणते आरोप केले?
- कोरोना ही वैश्विक महामारी होती.
- पण, त्याचेही राजकारण केले गेले.
- या कोरोनाच्या काळात काँग्रेसने मर्यादा ओलांडल्या आहेत.
- काँग्रेसने मुंबईत काय केले?
- मुंबईत परराज्यात राहणाऱ्या लोकांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी प्रेरित केले गेले.
- मोफत तिकीट दिले गेले.
- तुम्ही जेथले आहेत तिथे जा.
- बिहारमधील आहात तर तिथे जा, युपीमधील आहेत तर तिथे जा, असे सांगण्यात आले.
- येथील श्रमिकांना त्यांनी अनेक संकटात लोटले.
- प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
- तुम्ही आमच्या कष्टकरी बांधवांना अनेक संकटात ढकलले आहे.’
- तसं करताना त्यांनी महाराष्ट्रावरचं ओझं कमी करण्यासाठी उत्तरप्रदेश व इतर राज्यांमध्ये कोरोना पसरवल्याचा आरोप केला.
- खरा आक्षेर्पाह भाग हाच आहे.