Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एनसीबीचा सेल्फीवीर पंच, आता पालघर पोलिसांचाही आरोपी!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
palghar

मुक्तपीठ टीम

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने अटक केल्यानंतर एनसीबी ऑफिसमध्ये त्याच्याबोसत सेल्फी काढणार किरण गोसावी हा चर्चेत आहे. आर्यन खानच्या मुंबई क्रुझ ड्रग्स प्रकरणात किरण गोसावी हा एनसीबीचा पंच आहे. परंतू यानंतर किरण गोसावीने तरुणांना परदेशात नोकरी देतो असं सांगून लाखो रुपयांना गंडा घातल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

 

नेमकं प्रकरण काय?

  • आर्यन खान ड्रग्स प्रकरणामध्ये एनसीबीने किरण गोसावी याला साक्षीदार बनवलेलं आहे.
  • याच किरण गोसावीने अनेक तरुणांची फसवणूक करून त्यांना परदेशात नोकरी देण्याच्या आमिषाने लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे.
  • पालघर तालुक्यातील एडवण या गावातील दोन तरुणांचीही त्याने दोन वर्षांपूर्वी फसवणूक केल्याचा आरोप झाला आहे.
  • केळवे सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
  • उत्कर्ष तरे आणि आदर्श तरे या दोन तरुणांना मलेशिया येथे कामाला लावतो असे सांगून त्यांच्याकडून दीड लाखाची मागणी गोसावी याने केली होती.
  • नवी मुंबई येथील कार्यालयातून किरण गोसावी हे फसवणुकीची रॅकेट चालवत होता.
  • फेसबुकवरून मैत्री झाल्यानंतर उत्कर्ष आणि आदर्श यांना गोसावीने मलेशियाला कामाला लावण्याचे आश्वासन दिले.
  • त्यानंतर दोघांनीही गोसावीला बँक खात्यात पैसे पाठवले.
  • त्यानंतर त्याने दोघांनाही विमानाचे तिकीट आणि व्हिसा दिला.
  • कोचीन विमानतळावर पोहोचल्यानंतर विमानाचे तिकीट आणि व्हिसा बोगस असल्याचे त्यांना समजले.
  • ते पालघरला परत आले आणि आपली फसवणूक झाल्या प्रकरणी केळवा पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते.
  • दोन वर्षापूर्वी देण्यात आली होती गोसावी विरोधात फसवणूकीची तक्रार
  • केळवा पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नाही म्हणून दोघांनीही तक्रार अर्ज दाखल केला.
  • त्यानंतर दोन वर्षे उलटूनही पोलिसांनी कारवाई केली नसल्याचे उत्कर्ष तरे याने सांगितले होते.
  • माझ्यासारख्या अनेक तरुणांची फसवणूक झाल्याची दाट शक्यता असल्याचे उत्कर्ष याने सांगितले.
  • आमच्या फसवणूक प्रकरणामध्ये किरण गोसावी याला पोलिसांनी पकडून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी.
  • आम्हाला न्याय मिळवून द्यावा असे उतकर्ष तरे आणि आदर्श तरे यांनी सांगितले होते.

 

कोण आहे किरण गोसावी?

  • व्हायरल झालेले कथित एनसीबी अधिकारी किरण गोसावी हा देशभरात, परदेशात नोकरी मिळवून देणाऱ्या के. पी. जी. ड्रीम्ज रिक्रूटमेंट कंपनीचे मालक असल्याची चर्चा आहे.
  • विशेष म्हणजे के. पी. जी. ड्रीम्ज कंपनीचं मुंबई आणि नवी मुंबईत कार्यालय आहे.
  • बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात, खासगी गुप्तहेर अशीही के. पी. गोसावी यांची ओळख आहे.
  • गोसावी स्वत:च्या वाहनावर पोलिसांची पाटी लावून फिरताना कॅमेऱ्यात कैद असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
  • याशिवाय नवाब मलिक यांनीही तसा दावा केला आहे.
  • गोसावी याच्याविरोधात २०१८ मध्ये पुण्यातील तरुणाकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
  • मलेशियात नोकरीचं आमिष दाखवून ३ लाख उकळल्याचा आरोप संबंधित तरुणाने केला होता.

Tags: Aryan KhanmumbaiNCBshah rukh khanकिरण गोसावी
Previous Post

मुंबईत का होत आहे प्रचंड उकाडा? संशोधकांचा अभ्यास सांगतो फक्त ग्लोबल वार्मिंग नाही, ‘हे’ही आहे कारण…

Next Post

मुलगा सज्ञान झाला तर वडिलांची जबाबदारी संपते का? वाचा न्यायालयाचा महत्वाचा निकाल!

Next Post
Delhi high court

मुलगा सज्ञान झाला तर वडिलांची जबाबदारी संपते का? वाचा न्यायालयाचा महत्वाचा निकाल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!