मुक्तपीठ टीम
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने अटक केल्यानंतर एनसीबी ऑफिसमध्ये त्याच्याबोसत सेल्फी काढणार किरण गोसावी हा चर्चेत आहे. आर्यन खानच्या मुंबई क्रुझ ड्रग्स प्रकरणात किरण गोसावी हा एनसीबीचा पंच आहे. परंतू यानंतर किरण गोसावीने तरुणांना परदेशात नोकरी देतो असं सांगून लाखो रुपयांना गंडा घातल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
- आर्यन खान ड्रग्स प्रकरणामध्ये एनसीबीने किरण गोसावी याला साक्षीदार बनवलेलं आहे.
- याच किरण गोसावीने अनेक तरुणांची फसवणूक करून त्यांना परदेशात नोकरी देण्याच्या आमिषाने लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे.
- पालघर तालुक्यातील एडवण या गावातील दोन तरुणांचीही त्याने दोन वर्षांपूर्वी फसवणूक केल्याचा आरोप झाला आहे.
- केळवे सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
- उत्कर्ष तरे आणि आदर्श तरे या दोन तरुणांना मलेशिया येथे कामाला लावतो असे सांगून त्यांच्याकडून दीड लाखाची मागणी गोसावी याने केली होती.
- नवी मुंबई येथील कार्यालयातून किरण गोसावी हे फसवणुकीची रॅकेट चालवत होता.
- फेसबुकवरून मैत्री झाल्यानंतर उत्कर्ष आणि आदर्श यांना गोसावीने मलेशियाला कामाला लावण्याचे आश्वासन दिले.
- त्यानंतर दोघांनीही गोसावीला बँक खात्यात पैसे पाठवले.
- त्यानंतर त्याने दोघांनाही विमानाचे तिकीट आणि व्हिसा दिला.
- कोचीन विमानतळावर पोहोचल्यानंतर विमानाचे तिकीट आणि व्हिसा बोगस असल्याचे त्यांना समजले.
- ते पालघरला परत आले आणि आपली फसवणूक झाल्या प्रकरणी केळवा पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते.
- दोन वर्षापूर्वी देण्यात आली होती गोसावी विरोधात फसवणूकीची तक्रार
- केळवा पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नाही म्हणून दोघांनीही तक्रार अर्ज दाखल केला.
- त्यानंतर दोन वर्षे उलटूनही पोलिसांनी कारवाई केली नसल्याचे उत्कर्ष तरे याने सांगितले होते.
- माझ्यासारख्या अनेक तरुणांची फसवणूक झाल्याची दाट शक्यता असल्याचे उत्कर्ष याने सांगितले.
- आमच्या फसवणूक प्रकरणामध्ये किरण गोसावी याला पोलिसांनी पकडून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी.
- आम्हाला न्याय मिळवून द्यावा असे उतकर्ष तरे आणि आदर्श तरे यांनी सांगितले होते.
कोण आहे किरण गोसावी?
- व्हायरल झालेले कथित एनसीबी अधिकारी किरण गोसावी हा देशभरात, परदेशात नोकरी मिळवून देणाऱ्या के. पी. जी. ड्रीम्ज रिक्रूटमेंट कंपनीचे मालक असल्याची चर्चा आहे.
- विशेष म्हणजे के. पी. जी. ड्रीम्ज कंपनीचं मुंबई आणि नवी मुंबईत कार्यालय आहे.
- बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात, खासगी गुप्तहेर अशीही के. पी. गोसावी यांची ओळख आहे.
- गोसावी स्वत:च्या वाहनावर पोलिसांची पाटी लावून फिरताना कॅमेऱ्यात कैद असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
- याशिवाय नवाब मलिक यांनीही तसा दावा केला आहे.
- गोसावी याच्याविरोधात २०१८ मध्ये पुण्यातील तरुणाकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
- मलेशियात नोकरीचं आमिष दाखवून ३ लाख उकळल्याचा आरोप संबंधित तरुणाने केला होता.