मुक्तपीठ टीम
संकटमोचक हनुमान चालिसा पठणासाठी टोकाचा आग्रह धरणाऱ्या खासदार नवनीत राणांवरच संकट ओढवलं. तेही त्यांच्या हनुमान भक्तीबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण करणारं हे संकट न्यूज चॅनलवर लाइव्ह ओढवलं. या व्हिडीओत न्यूज चॅनलच्या अँकरने त्यांची मुलाखत घेताना तुम्ही हनुमानाची इतकी भक्ती करता. मग, हनुमानाचं नाव हनुमान कसं पडलं? असं विचारलं. या साध्या सोप्या प्रश्नाचं उत्तरही राणांना देता नाही आलं. तुम्ही इतिहास विचारणार असाल तर आम्ही इतिहासाचाही अभ्यास करू, असं सांगत त्यांनी माहिती नसल्याची कबुलीच दिली..
मुंबईतील गल्ली पासून ते दिल्लीपर्यंत हनुमान चालीसाचे पठण करत प्रसिद्धी मिळवणाऱ्या राणांच्या मनात हनुमानाविषयी अपार श्रद्धा आणि भक्तिभाव असल्याचं भासतं. मात्र या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओतून अनेकांचा हा भ्रम दूर झालेला आहे. ट्विटरवरील @faijalkhantroll या लोकप्रिय हँडलने न्यूज चॅनलचा हा व्हिडीओ ट्वीट केला आहे.
एक प्रशिक्षण शिबीर ठेवायला काय अडचण आहे भाजपला..! pic.twitter.com/CT9pSCtyeB
— Faijal Khan (@faijalkhantroll) May 16, 2022
व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं काय?
- मातोक्षीबाहेर हनुमान चालीसा पठणावरून निर्माण झालेल्या वादानंतर राणांना अटक झाली.
- जामीन मिळाल्यानंतर या दोघांनी दिल्लीतील प्राचीन मंदिरात हनुमान चालीसा पठण आणि महाआरती केली.
- मात्र, याच राणा दाम्पत्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
- नवभारत या न्यूज चॅनलवर ज्येष्ठ पत्रकार आणि टाइम्स नेटवर्कच्या समूह संपादिका नाविका कुमार यांनी घेतलेल्या मुलाखतीदरम्यान विचारण्यात आलेल्या एका सरळस्पष्ट प्रश्नावर नवनीत राणा आणि रवी राणा यांची चांगलीच पंचाईत होताना दिसली.
- या व्हिडिओत कार्यक्रमाच्या अँकर नाविका सूत्रसंचालिकेने नवनीत राणा यांना तुम्ही हनुमानाची इतकी भक्ती करता. मग मला एक सांगा की, हनुमानाचं नाव हनुमान कसं पडलं? हा प्रश्न विचारला.
- मात्र नवनीत राणा यांना साधं याचं उत्तरही देता आलं नाही, आणि रवी राणा हे सुद्धा यावेळी शांत बसून होते. पण त्यांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता दिसत होती.
हनुमान नाव कसं पडलं ते सांगण्यासाठी इतिहास वाचणार!
- यावर कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिकेने पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारला.
- हनुमानाचं नाव पहिले हनुमान नव्हतं, ते कसं पडलं, असे नवनीत राणा यांना विचारण्यात आले.
- त्यावर नवनीत राणा यांनी म्हटले की, तुम्ही आता इतिहासात नेत असाल तर आम्ही हनुमानाविषयी माहिती घेऊ.
- या सगळ्याचा इतिहास पुन्हा वाचू.
- मी हनुमान चालीसा वाचते, त्याविषयी मी नक्की बोलू शकेन, असे उत्तर नवनीत राणा यांनी दिले.
- सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.