Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हास्ययोग चळवळीचा नवचैतन्याचा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन, आज व्याख्यान व सांस्कृतिक कार्यक्रम

September 5, 2026
in चांगल्या बातम्या
0
Laugh Club Movement Laugh Club Movement

मुक्तपीठ टीम

‘स्वच्छ पुणे, सुंदर पुणे’ हसरे करण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या नवचैतन्य हास्ययोग परिवार संस्थेच्या वर्धापनदिना निमित्ताने हास्यक्लब चळवळीचा रौप्य महोत्सव साजरा करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. गुरुवार, दि. २२ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ९.३० ते रात्री ८.०० या वेळेत गणेश कला क्रीडामंच, स्वारगेट येथे हे कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती संस्थेचे मुख्य समन्वयक मकरंद टिल्लू यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मकरंद टिल्लू म्हणाले, “विठ्ठल काटे व सुमन काटे यांच्या प्रेरणेतून १९९७ मध्ये पुण्यातील संस्थेच्या पहिल्या हास्यक्लबची स्थापना झाली. हास्यक्लब स्थापनेच्या त्यांच्या कार्याचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. त्यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या नवचैतन्य हास्ययोग परिवाराच्या सुमारे २१५ शाखांमधून सुमारे २५ हजाराहून अधिक शाखा सदस्यांनी शारीरिक व मानसिक आरोग्याचा लाभ घेतला आहे. १३ विश्वस्त, ४० विभागप्रमुख तसेच शाखाप्रमुख, शाखा उपप्रमुख यांच्या सहकार्याने हा उपक्रम जनमानसात रुजला आहे. हास्य हे अमूल्य असल्याने नवचैतन्य हास्ययोग परिवारातील व्यायामासाठी कोणतेही मूल्य घेतले जात नाही. संस्थेच्या विविध शाखातून अनेक सामाजिक उपक्रम केले जातात.”

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल काटे म्हणाले “मकरंद टिल्लू हे गेली पंचवीस वर्षे महाराष्ट्रभर हास्ययोगाचा प्रसार व प्रचार करण्याचे कार्य करीत आहे. त्यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या इंटरनेटवरील ऑनलाइन हास्यक्लब शाखेचा लाभ सुमारे पाच हजार तीनशे सदस्यांनी घेतला आहे. यामध्ये नऊ देशातून, देशाच्या विविध प्रांतातून, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून सदस्य सहभागी होत आहेत.”

संस्थेचे सचिव पोपटलाल शिंगवी म्हणाले, “विठ्ठल काटे यांचाही ८५ वा वाढदिवस या दिवशी आहे. या कार्यक्रमाला संस्थेच्या सर्व शाखातून सुमारे दोन हजार सदस्य उपस्थित राहणार आहेत. सकाळी ९.३० वाजता उद्घाटन समारंभ होणार आहे. उद्घाटन समारंभाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, ज्येष्ठ साहित्यिक व संत साहित्याचे व्यासंगी अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे , क्रीडावैद्यक तज्ञ डॉ. हिमांशु वझे, माजी एअर मार्शल श्री. भूषण गोखले, कॉसमॉस बँकेचे चेअरमन मिलिंद काळे, उपाध्यक्ष सचिन आपटे, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते पुनीत बालन, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश धोका उपस्थित राहणार आहेत.  क्रीडावैद्यक तज्ञ डॉ. हिमांशु वझे यांचे ‘ स्वास्थ्यमय वसा, विनाकारण हसा’ आणि ज्येष्ठ साहित्यिक व संत साहित्याचे व्यासंगी अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांचे ‘ हास्य, आनंद आणि तत्वज्ञान ‘ या विषयावर  यावेळी व्याख्यान  होणार आहे.

दुपारी २.०० ते ४.०० या वेळेत शाखांचे सांस्कृतिक कार्यक्रम होतील. सायंकाळी ५.०० वाजता समारोप, तसेच भारतरत्न गानसरस्वती लतादीदी मंगेशकर यांना समर्पित ‘रंगीला… रे’ हा मनीषा निश्चल व सहकारी यांचा वाद्यवृंदासह कार्यक्रम होणार आहे.”

पाहा:


Tags: Clean Pune-Sunder PuneCultural Eventsgood newsLaugh Club MovementmuktpeethSilver Jubilee Anniversaryचांगली बातमीमुक्तपीठरौप्यमहोत्सवी वर्धापनदिनसांस्कृतिक कार्यक्रमस्वच्छ पुणे-सुंदर पुणेहास्यक्लब चळवळ
Previous Post

ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधील विद्यार्थी व शिक्षकांचे १० पेटेन्ट प्रकाशित

Next Post

हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेडमध्ये पदवीधर आणि टेक्निशियन डिप्लोमा अॅप्रेंटिसशिपची संधी

Next Post
Apprenticeship in Hindustan Shipyard Limited

हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेडमध्ये पदवीधर आणि टेक्निशियन डिप्लोमा अॅप्रेंटिसशिपची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!