मुक्तपीठ टीम
मकरंद टिल्लू म्हणाले, “विठ्ठल काटे व सुमन काटे यांच्या प्रेरणेतून १९९७ मध्ये पुण्यातील संस्थेच्या पहिल्या हास्यक्लबची स्थापना झाली. हास्यक्लब स्थापनेच्या त्यांच्या कार्याचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. त्यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या नवचैतन्य हास्ययोग परिवाराच्या सुमारे २१५ शाखांमधून सुमारे २५ हजाराहून अधिक शाखा सदस्यांनी शारीरिक व मानसिक आरोग्याचा लाभ घेतला आहे. १३ विश्वस्त, ४० विभागप्रमुख तसेच शाखाप्रमुख, शाखा उपप्रमुख यांच्या सहकार्याने हा उपक्रम जनमानसात रुजला आहे. हास्य हे अमूल्य असल्याने नवचैतन्य हास्ययोग परिवारातील व्यायामासाठी कोणतेही मूल्य घेतले जात नाही. संस्थेच्या विविध शाखातून अनेक सामाजिक उपक्रम केले जातात.”
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल काटे म्हणाले “मकरंद टिल्लू हे गेली पंचवीस वर्षे महाराष्ट्रभर हास्ययोगाचा प्रसार व प्रचार करण्याचे कार्य करीत आहे. त्यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या इंटरनेटवरील ऑनलाइन हास्यक्लब शाखेचा लाभ सुमारे पाच हजार तीनशे सदस्यांनी घेतला आहे. यामध्ये नऊ देशातून, देशाच्या विविध प्रांतातून, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून सदस्य सहभागी होत आहेत.”
संस्थेचे सचिव पोपटलाल शिंगवी म्हणाले, “विठ्ठल काटे यांचाही ८५ वा वाढदिवस या दिवशी आहे. या कार्यक्रमाला संस्थेच्या सर्व शाखातून सुमारे दोन हजार सदस्य उपस्थित राहणार आहेत. सकाळी ९.३० वाजता उद्घाटन समारंभ होणार आहे. उद्घाटन समारंभाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, ज्येष्ठ साहित्यिक व संत साहित्याचे व्यासंगी अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे , क्रीडावैद्यक तज्ञ डॉ. हिमांशु वझे, माजी एअर मार्शल श्री. भूषण गोखले, कॉसमॉस बँकेचे चेअरमन मिलिंद काळे, उपाध्यक्ष सचिन आपटे, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते पुनीत बालन, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश धोका उपस्थित राहणार आहेत. क्रीडावैद्यक तज्ञ डॉ. हिमांशु वझे यांचे ‘ स्वास्थ्यमय वसा, विनाकारण हसा’ आणि ज्येष्ठ साहित्यिक व संत साहित्याचे व्यासंगी अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांचे ‘ हास्य, आनंद आणि तत्वज्ञान ‘ या विषयावर यावेळी व्याख्यान होणार आहे.
दुपारी २.०० ते ४.०० या वेळेत शाखांचे सांस्कृतिक कार्यक्रम होतील. सायंकाळी ५.०० वाजता समारोप, तसेच भारतरत्न गानसरस्वती लतादीदी मंगेशकर यांना समर्पित ‘रंगीला… रे’ हा मनीषा निश्चल व सहकारी यांचा वाद्यवृंदासह कार्यक्रम होणार आहे.”