Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

यूपीचा आवली मतदार! ईव्हीएममध्ये टाकले फेविक्विक…जाम करून टाकलं मतदान!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
evm

मुक्तपीठ टीम

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात ५९ जागांवर मतदान होत आहे. दरम्यान लखीमपूर सदर विधानसभा मतदारसंघातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. बुधवारी सकाळी मतदानाला सुरूवात झाल्यानंतर सुमारे तासभर एका खोडकर मतदाराने ईव्हीएममध्ये फेविक्विक टाकले, त्यामुळे बटण दाबले जात नसल्याने मतदार नाराज झाले. ही माहिती बीएलओमार्फत अधिकाऱ्यांना मिळताच एकच खळबळ उडाली. याची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने मतदान यंत्र बदलले आणि सुमारे १५ मिनिटांनी पुन्हा मतदानाला सुरुवात झाली. मिळालेल्या माहितीनुसार, खोडकर मतदाराने सायकल चिन्हाच्या बटणावर फेविक्विक लावले होते.

 

लखीमपूर विधानसभा मतदारसंघातील कादीपूर सानी मतदान केंद्रावर हे संपूर्ण प्रकरण समोर आले. येथील जिल्हा अधिकारी महेंद्र बहादूर सिंह यांनी सांगितले की, ही बाब निदर्शनास येताच ईव्हीएममध्ये तात्काळ बदल करण्यात आले असून तेथे पुन्हा मतदान सुरू झाले आहे. तसेच संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला लवकरच अटक करण्यात येईल, असेही सांगण्यात आले.

चौथ्या टप्प्यात ५९ जागांवर मतदान

  • उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात ५९ जागांवर मतदान होत आहे.
  • या टप्प्यात २.१३ कोटी मतदार ६२४ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत.
  • या टप्प्यातील मतदानासाठी ९१ महिला उमेदवार रिंगणात आहेत.
  • या टप्प्यात १६ जागा राखीव आहेत.
  • मतदान निष्पक्ष आणि शांततेत पार पडावे यासाठी निवडणूक आयोगाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे.
  • या जागांवर २०१७ मध्ये ६२.५५ टक्के मतदान झाले होते.
  • या टप्प्यात पिलीभीत, लखीमपूर खेरी, सीतापूर, हरदोई, उन्नाव, लखनौ, रायबरेली, बांदा आणि फतेहपूर येथे मतदान होत आहे.
  • एडीजी कायदा आणि सुव्यवस्था प्रशांत कुमार म्हणाले की, केंद्रीय दलाच्या ८६० कंपन्या मतदानासाठी तैनात करण्यात आल्या आहेत.

Tags: evm machinefeviquickUP Election 2022ईव्हीएम मशिनउत्तर प्रदेश निवडणुकाफेविक्विक
Previous Post

‘हे’ दाऊद शरण सरकार! बाळासाहेब ठाकरे असते तर मंत्र्याला काढून टाकले असते! – फडणवीस

Next Post

राज्यपालांनी अर्धवट सोडलेलं पूर्ण भाषण कसं होतं? वाचा सविस्तर…

Next Post
Bhagat Singh Koshyari Incomplete Speech At budget Session day 1

राज्यपालांनी अर्धवट सोडलेलं पूर्ण भाषण कसं होतं? वाचा सविस्तर...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!