Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

उल्हासनगरच्या मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

March 2, 2022
in घडलं-बिघडलं
0
National Science Day program in Ulhasnagar at Matoshri Ramabai Ambedkar School

मुक्तपीठ टीम

उल्हासनगरमधील राजर्षि छत्रपती शाहू विद्या प्रसारक मंडळ संचालित मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्त प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक आणि अन्य नागरिक मिळून सुमारे दीडशे लोक उपस्थित होते.
National Science Day program in Ulhasnagar at Matoshri Ramabai Ambedkar School
हे विद्यालय गरीब, वंचित विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क शिक्षण देण्याची सोय करते. मंडळाचे अध्यक्ष मा. महादेव सोनावणे या कामात व्यक्तीगत लक्ष घालतात. गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी ते तळमळीने काम करीत असतात. या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान दिनानिमित्त प्रबोधन कार्यक्रम करावा म्हणून त्यांनी महा. अंनिस कल्याण शाखेस कळवले.  कल्याण शाखेचे कार्यकर्ते आणि ‘अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका’ या मासिकाचे कार्यकारी संपादक उत्तम जोगदंड यांनी प्रबोधन कार्यक्रम सादर केला.
National Science Day program in Ulhasnagar at Matoshri Ramabai Ambedkar School
कार्यक्रमाची सुरुवात  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार घालून झाली. नंतर विज्ञान दिन का साजरा केला जातो, विज्ञान म्हणजे काय, विज्ञानाचे फायदे, वैज्ञानिक दृष्टीकोन, अंधश्रद्धा या विषयांवर माहिती देतांनाच मधून मधून भोंदू बाबा करतात तसल्या ‘चमत्कारां’चे प्रयोग उत्तम जोगदंड यांनी करून दाखविले. यात, हवेतून सोनसाखळी काढणे, प्रश्नचिन्हावर बेल्ट अडकवून गुरुत्वामध्य संकल्पना समजावून सांगणे, नारळातली करणी, लिंबात लाल धागा काळा करणारे भूत, कलशामध्ये ठराविक अंतराने येणारे पाणी हे प्रयोग करून दाखविले. कार्यक्रमाच्या शेवटी या चमत्कारांमगील विज्ञान किंवा हातचलाखी सांगून त्याची रहस्ये सांगितल्यावर विद्यार्थी खूप चकित झाले. सर्वांना महा अंनिसच्या कामाची माहिती करून देण्यात आली. कार्यक्रम संपल्यावर विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारले. त्यांच्या शंकांचे समाधान करून दिल्यावर त्यांना खूप आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले आणि पुन्हा असा कार्यक्रम शाळेत घ्यावा म्हणून आग्रह धरला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महादेव सोनावणे, मीनाक्षी सोनावणे मॅडम, जी टी पवार सर यांनी मेहनत घेतली.

Tags: ulhasnagarउल्हासनगरमातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यालराष्ट्रीय विज्ञान दिवस
Previous Post

मुंबईतील शाळा विद्यार्थ्यांनी फुलल्या…पूर्ण क्षमतेनं सुरु!

Next Post

रशियातील भारतीय वंशाच्या आमदाराचा प्रश्न: जर चीनने बांगलादेशमध्ये लष्करी तळ आणू पाहिला, तर भारताची काय प्रतिक्रिया असेल?

Next Post
Dr Abhay Singh Russia

रशियातील भारतीय वंशाच्या आमदाराचा प्रश्न: जर चीनने बांगलादेशमध्ये लष्करी तळ आणू पाहिला, तर भारताची काय प्रतिक्रिया असेल?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!