Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोनात अनाथ विद्यार्थ्यांना ५० हजारांची ‘राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र’ देऊन वर्षश्राद्ध साजरे

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
National Savings Certificate

मुक्तपीठ टीम

कोरोनात मृत्यू झालेल्या वडिलांचे वर्ष श्राद्ध करताना केवळ धार्मिक विधी न करता ज्या शिक्षण घेणाऱ्या मुलांचे वडील कोरोनात मृत्यू झाले आहेत, अशा मुलांना प्रत्येकी १० हजार रुपयांचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र देऊन त्यांच्या पुढील शिक्षणाला मदत करून होशिंग कुटुंबाने वेगळाच आदर्श निर्माण केला.

 

सोनई(ता.नेवासा)येथील अनिल होशिंग यांचे मागील वर्षी कोरोनात निधन झाले. त्यांच्या निधनाला एक वर्ष पूर्ण होताना अमेरिकेत राहणारा त्यांचा मुलगा अभिजित होशिंग यांनी वडीलांची स्मृती जपण्यासाठी कोरोनात विधवा झालेल्या महिलांच्या मुलांच्या शिक्षणाला मदत करण्याचे ठरवले. त्याचे मामा हेरंब कुलकर्णी यांच्याशी चर्चा करून रोख रक्कम देण्यापेक्षा राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र दिले तर पुढील उच्च शिक्षणाला उपयोग होऊ शकतो असे ठरवले.

 National Savings Certificate

याप्रमाणे कोरोना पुनर्वसन समितीचे नेवासा तालुका समन्वयक कारभारी गरड व अमित होशिंग यांनी या कुटुंबांशी संपर्क करून सोनई,नेवासा, बीड परिसरातील पाच गरजु विद्यार्थी निवडले,पोस्टात कागदपत्रे पूर्ण केली व प्रत्येकी १०हजार रुपयांचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र आज वर्षश्राद्धाच्या दिवशी सकाळी घरगुती कार्यक्रमात  अनिता होशिंग यांच्या हस्ते त्या पाच महिला व मुलांना हे प्रमाणपत्र देण्यात आले.

 

याप्रसंगी अमेरिकेतून अभिजित होशिंग यांनी सर्वांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला व वडील गमावण्याचे आमचे व या मुलांचे दुःख एकच असल्यामुळे त्यांचा मोठा भाऊ म्हणून मी व अमित या मुलांच्या शिक्षणासाठी सतत पाठीशी उभे राहू असे सांगितले. या प्रसंगी  कारभारी गरड यांनी प्रास्ताविक केले  व कोरोनात विधवा महिलांची विदारक स्थिती सांगितली. नगर जिल्हा समन्वयक अशोक कुटे यांनी व राहुरी तालुका समन्वयक आप्पासाहेब ढूस यांनी या उपक्रमाचे कौतुक केले व याचे अनुकरण गावोगावी वर्ष श्राद्धात व्हायला हवे अशी भावना व्यक्त केली. भारत आरगडे यांनी या प्रसंगी या मुलांना अभिजित,अमितने  लिहिलेल्या भावनिक पत्राचे वाचन केले तर कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांनी महाराष्ट्रात अशी २५००० मुले अनाथ झाली आहेत.
परदेशातील भारतीयांनी व महाराष्ट्रातील दानशूर व्यक्तींनी अभिजीत होशिंग यांच्या प्रमाणे मुलांना दत्तक घेऊन राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र दिले तर या मुलांच्या शिक्षणाची भावी काळात सोय होऊ शकते अशी अपेक्षा व्यक्त केली.


Tags: Anil HoshingCorona Orphan studentsmuktpeethNational Savings CertificatenevasaSonai villageअनाथ विद्यार्थ्यीअनिल होशिंगकोरोनानेवासामुक्तपीठराष्ट्रीय बचत प्रमाणपत्रवर्षश्राद्धसोनई गावहोशिंग कुटुंब
Previous Post

राज्यात ओमायक्रॉनचे ७ नवे रुग्ण! तर कोरोनाचे ६९५ नवीन रुग्ण, ६३१ रुग्ण बरे!

Next Post

सरकार कर्मचाऱ्यांचे कामाचे तास निश्चित करणार आणि आणणार ‘वर्क फ्रॉम होम’ कायदा!

Next Post
work from home

सरकार कर्मचाऱ्यांचे कामाचे तास निश्चित करणार आणि आणणार 'वर्क फ्रॉम होम' कायदा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!