Wednesday, June 4, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता महिला तलवारबाजी लीग स्पर्धा, महिलांसाठी राष्ट्रीय पातळीवरील पहिलीच तलवारबाजी स्पर्धा!

July 23, 2022
in featured, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Women's Fencing League Competition

मुक्तपीठ टीम

देशात पहिल्यांदाच महिला तलवारबाजी लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नवी दिल्ली येथील तालकटोरा इनडोअर स्टेडीयममध्ये येत्या २ जुलै रोजी पहिली खेलो इंडिया महिला तलवारबाजी लीग स्पर्धा असेल. तीन टप्प्यांमध्ये होणाऱ्या आणि २९ जुलैपर्यंत चालणारी ही स्पर्धा महिलांसाठी राष्ट्रीय पातळीवरील पहिलीच तलवारबाजी स्पर्धा आहेत.

देशभरातील २० राज्यांतून ३०० हून अधिक महिलांनी या स्पर्धेत कॅडेट (१७ वर्षांहून कमी वयाच्या), कनिष्ठ (२०वर्षांपेक्षा कमी वयाच्या), वरिष्ठ (२० वर्षांहून अधिक वयाच्या)स्पर्धक श्रेणीमध्ये सहभाग नोंदविला आहे. टोक्यो ऑलिंपिक तसेच टॉप्स अर्थात टार्गेट ऑलिंपिक पोडीयम योजनेत चमकदार कामगिरी करणारी भवानी देवी या स्पर्धेत वरिष्ठ श्रेणीमध्ये सहभागी होणार आहे. ती तामिळनाडू राज्याचे प्रतिनिधित्व करत आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या इतर टॉप्स खेळाडूंमध्ये जम्मू-काश्मीरची श्रेय गुप्ता, छत्तीसगडची वेदिका खुसी, हरियाणाची तनिष्का खत्री आणि शीतल दलाल यांचा समावेश आहे.

या स्पर्धेत सहभागी इम्फाळ,औरंगाबाद,गुवाहाटी आणि पतियाळा येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या( साई) राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राचे प्रतिनिधित्व करत आहेत. खेलो इंडिया महिला तलवारबाजी लीग स्पर्धा या महिलांसाठीच्या खुल्या राष्ट्रीय पातळीवरील मानांकन स्पर्धा असून एफएआय अर्थात भारतीय तलवारबाजी संघटनेच्या पोर्टलवर नोंदणी केलेल्या आणि त्यांच्या संबंधित राज्यांनी नामनिर्देशित केलेल्या खेळाडू देखील त्यात भाग घेत आहेत.

ही स्पर्धा तीन टप्प्यांमध्ये घेण्यात येईल. पहिला आणि दुसरा टप्पा नवी दिल्ली येथे होणार आहे तर तिसऱ्या टप्प्यातील स्पर्धा पतियाळा येथे पार पडतील. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने या तिन्ही टप्प्यांच्या आयोजनासाठी एकूण १ कोटी ५४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. प्रत्येक टप्प्यासाठी बक्षिसाची रक्कम १७ लाख १० हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय तलवारबाजी महासंघाच्या नियमानुसार या स्पर्धेत लीग पातळीवर सर्वोच्च पातळीवरील खेळाडूंमध्ये थेट बाद फेरीची पद्धत अनुसरली जाईल. खेलो इंडिया महिलांच्या तलवारबाजी स्पर्धेसह तालकटोरा स्टेडीयम मध्ये उपरोल्लेखित तारखांना पुरुषांच्या एफएआय मानांकन स्पर्धा देखील होणार आहेत.

खेलो इंडिया महिलांची तलवारबाजी स्पर्धा हा खेलो इंडियाच्या महिला विभागासाठी केलेला आणखी एक उपक्रम असून त्याद्वारे विस्तृत प्रकारच्या क्रीडा स्पर्धांमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक पावले उचलण्यात आली आहेत. यासाठी दिला जाणारा पाठिंबा केवळ अनुदानाच्या बाबतीत नव्हे तर योग्य प्रकारे संघटनआणि क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाच्या बाबतीत देखील दिला जात आहे. आतापर्यंत आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये खेलो इंडिया महिला तिरंदाजी राष्ट्रीय मानांकन स्पर्धा, खेलो इंडिया युवा महिला भारोत्तोलन राष्ट्रीय मानांकन स्पर्धा, खेलो इंडिया महिला कुस्तीच्या राष्ट्रीय स्पर्धा, खेलो इंडिया महिला हॉकी लीग (21 वर्षांखालील) तसेच खेलो इंडिया मुलींची फुटबॉल लीग स्पर्धा (१७ वर्षांखालील) यांचा समावेश आहे.


Tags: Competition for WomenFencing Competitiongood newsmuktpeethNational LevelWomen's Fencing League Competitionघडलं-बिघडलंचांगली बातमीतलवारबाजी स्पर्धामहिला तलवारबाजी लीग स्पर्धामहिलांसाठी स्पर्धामुक्तपीठराष्ट्रीय पातळी
Previous Post

“उत्तर भारतीय – दक्षिण भारतीय कलाकार नाही, सर्व भारतीय अभिनेत्यांना भारतीय कलाकार म्हणा”

Next Post

गणित आणि विज्ञान आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना ३ सुवर्ण आणि १६ रौप्य पदके!

Next Post
International Olympiad

गणित आणि विज्ञान आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना ३ सुवर्ण आणि १६ रौप्य पदके!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!